Maharashtra

श्रीक्षेत्र उनपदेव वनक्षेत्रांत कृषी दिनानिमित्त वृक्ष लागवडीचा शुभारंभ

श्रीक्षेत्र उनपदेव वनक्षेत्रांत कृषी दिनानिमित्त वृक्ष लागवडीचा शुभारंभ…..

श्रीक्षेत्र उनपदेव वनक्षेत्रांत कृषी दिनानिमित्त वृक्ष लागवडीचा शुभारंभ

अडावद ता.चोपडा प्रतिनिधी- 
येथुन जवळच असलेल्या श्रीक्षेत्र उनपदेव येथील राखीव वनक्षेत्र क्रमांक १९७ मध्ये आज दि. १ जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधत तसेच राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या यंदाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ पर्यावरण प्रेमी जितेंद्रकुमार शिंपी आणि पी.आर.माळी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी वनपाल आर. एन. खैरनार,वनश्री दशरथ पाटील,वनरक्षक वाय. बी. सोनवणे , एच. बी. सोनवणे ,आर. ए.भुतेकर,संजय माळी,हूसेन तडवी तसेच नवलभाऊ कृषी महाविदयालय अमळनेर  चे कृषिदूत अक्षय महाजन,नीला शनमुखा ,विकास धनगर,सचिन धनगर,रोहित नाहिदे,प्रीतीश जगताप ,राहुल भुसारी, ऋषिकेश पवार आदींसह निसर्ग प्रेमी ग्रामस्थांची उपस्थिती होती.यावेळी करंज,कांचन,शिसु,वायकरण पापडा,आवळा,साग, दिर्घोयुष्यी रोपांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमांचे प्रास्तविक आणि आभार प्रदर्शन वनश्री दशरथ पाटील यांनी केले.

श्रीक्षेत्र उनपदेव वनक्षेत्रांत कृषी दिनानिमित्त वृक्ष लागवडीचा शुभारंभ
 
फोटो कँप्शन – उनपदेव येथे वृक्ष  लागवड करीतांना जितेंद्रकुमार शिंपी सोबत पी.आर.माळी,दशरथ पाटील,योगेश सोनवणे आदि.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button