Chimur

नेरी येथे शॉओलीन टेम्पल्स कुंग -फु ची बेल्ट ग्रेडेशन संपन्न

नेरी येथे शॉओलीन टेम्पल्स कुंग -फु ची बेल्ट ग्रेडेशन संपन्न

ज्ञानेश्वर जुमनाके चिमूर

चिमूर : नाताळ दिनाचे औचित्य साधुन नेरी येथील शॉओलीन टेम्पल्स कुंग -फु चे ग्रँडमास्टर शिफु-सुशांत इन्दोरकर यांचे अध्यक्षतेत बेल्ट ग्रेडेशन पार पडली .बेल्ट ग्रेडेशन मध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन भद्रावती चे शिफु- शितल तेलंग ६ डिग्री ब्लॅक बेल्ट सिंदेवाही येथील शिफु- रवि दुधे ६ डिग्री ब्लॅक बेल्ट व मॉस्टर राकेश दिप ४ डिग्री ब्लॅक बेल्ट भद्रावती यांनी बेल्ट ग्रेडेशन घेतली . तसेच सर्वांनी कुंग- फु प्रॅक्टीस चे धडे व स्पायरींग टेक्नीक चे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थांना दिले .
संपुर्ण बेल्ट ग्रेडेशन हे दिवंगत माननीय ग्रँडमास्टर नरेन्द्र मेश्राम यांना आदरांजली वाहुन त्यांच्या स्मरणार्थ बेल्ट वितरण करण्यात आले . त्यामध्ये रेशम पिसे यांना ब्लॅक बेल्ट देऊन सन्मानीत करण्यात आले पंकज चौधरी ब्राऊन बेल्ट , कुजंली पिसे मरुण बेल्ट , सागर खोब्रागडे एलो बेल्ट व प्रणव आष्टणकर एलो बेल्ट नी सन्मानीत करण्यात आले . शिफु- विशाल इन्दोरकर व मॉस्टर पिपलायन आष्टणकर यांनी स्पायरींग टेक्नीक चे प्रात्याक्षीक दिले . कार्यक्रमाला उपस्थीत समिक्षा इन्दोरकर १ डिग्री ब्लॅक बेल्ट , भोलेनाथ शेंडे ब्लॅक बेल्ट यांनी प्रशिक्षणार्थांचे अभिनंदन केले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button