Maharashtra

शारदाई फॉउन्डेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप…..

शारदाई फॉउन्डेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप…..

शारदाई फॉउन्डेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप.....

नंदुरबार  – धडगाव तालुक्यातील सामाजिक संस्था म्हणुन कार्यरत असलेली उमराणी बु येथील शारदाई फॉउन्डेशन यांच्या मार्फत तालुक्यातील अतिदुर्गम भागातील काल्लेखेतपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील गरीब वंचित आदिवासी समुदायातील विध्यार्थी शैक्षणिक साहित्य पासुन वंचित राहू नये व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत चालु असावे आणि पटसंख्या टिकून राहावी या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे शारदाई फॉउन्डेशनच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप करण्यात येत असते त्याच प्रमाणे यंदा वर्षीही तालुक्यातील विविध जि.प.शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार असुन आज जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले…
 कार्यक्रमाच्या सुरवातीला काल्लेखेतपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील बालसंसद व विध्यार्थ्यांकडून फॉउन्डेशनच्या उपस्थित पाहुण्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागतगीत सादर करून स्वागत करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षंस्थांनी श्रीमती.शारदाबाई एल. पावरा यांची निवळ बालसंसद यांनी केली तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी युवा एकता परिषदचे तालुकाध्यक्ष राकेश पावरा, आदिवासी टायगर सेना तालुकाध्यक्ष इंजि. सचिन बी. पावरा यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      यावेळी तालुक्यातील शारदाई फॉउन्डेशन परिवाराच्या वतीने शाळेतील अत्यंत गरीब व गरजू अशा विद्यार्थ्याना वही-पेन, चित्रकला वही, पेन्सिल, रंग पेन्सिल, खेळण्याचे साहित्य इत्यादी साहित्याचे वितरण यावेळी करण्यात आले.
 याप्रसंगी शारदाई फॉउन्डेशनचे अध्यक्ष श्री. जगदिश एल. पावरा यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असणाऱ्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागते, काहींना शालेय साहित्य घेता येत नाही, काहींना दप्तर तर अनेकांकडे वह्या घेण्यासही चणचण असते, अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा या उद्देशाने आपली सामाजिक बांधीलकी म्हणुन शारदाई फॉउन्डेशनच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप करून शिक्षणाची रुची टिकवून ठेवण्यासाठी आणि शासनाच्या सर्व शिक्षा अभियान या उद्दिष्टाला साद्य करण्यासाठी फॉउन्डेशनच्या माध्यमातून प्रयन्त चालु आहेत. तसेच विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहण्याचा व जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा सल्ला दिला आणि कोणत्याही प्रकारे शैक्षणिक साहित्य पासुन अडचण येत असल्यास निसंकोचपणे फॉउन्डेशनशी संपर्क करावे असे प्रतिपादन केले…..
यावेळी राकेश पावरा यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले शारदाई फॉउन्डेशन यांच्यातर्फे तालुक्यातील विविध शाळांमधील सर्व मुलांना वह्यांचं वाटप करण्यात येणार असुन प्रत्येक मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, त्यांना प्रोत्साहन तसेच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून प्रतिवर्षीप्रमाणे फॉउन्डेशनचे लक्षवेधी उपक्रम यावर्षीही राबवण्यात येत आहेत त्याचप्रमाणे नियमित शाळेत येऊन नियमित अभ्यास करून उंच भरारी घ्या असे म्हटले.
यावेळी इंजि. सचिन पावरा यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, आजच्या कार्यक्रमातुन शालेय साहित्य वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा लाख मोलाचा आहे. शारदाई फॉउन्डेशनच्या माध्यमातून आजचा  शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम हा खरोखर गौरवास्पद असा उपक्रम आहे, आज दुर्गम भागातील परिस्थिती नाजूक असल्याने लहानपणापासुनच शिक्षणापासुन वंचित राहावे लागते पण आज शासनाकडून, सामाजिक संस्था, संघटना यांच्या मार्फत शैक्षणिक साहित्य पासुन कोणीही वंचित राहू नये म्हणुन शासनाच्या सर्व शिक्षा अभियान हा उपक्रमाद्वारे शिक्षण दिले जात आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष फॉउन्डेशनचे सचिव श्रीमती. शारदाबाई पावरा यांनी म्हटले की आदिवासी समाज दुर्गम अशा डोंगराळ प्रदेशात राहत असल्याने शिक्षणाची विशेषतः शैक्षणिक गंगा तळागाळापर्यंत अजुनही पोहचली असे म्हणता येत नाही. तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील गरिबीमुळे विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळत नाहीत, त्यामुळे शिक्षणापासुन वंचित आहेत आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील चिमुकल्या अशा विध्यार्थाना शिक्षणाची रुची राहावी व येणाऱ्या भविष्य उज्ज्वल होऊन ज्या समाजातून जन्माला आलोय त्या समाजाला प्रगतीकडे नेण्याच कार्य आणि समाजाच देणं म्हणुन भविष्यातील येणारी आपली पिढी ही शिक्षित असायला हवीय म्हणुन थोडं का होईना आज फॉउन्डेशनच्या माध्यमातून प्रयत्न चालु आहे तसेच शालेय साहित्य वाटप उर्वरित जिल्हा परिषद शाळेत जाऊन साहित्य वाटप करण्यात येणार आहे असे मनोगत व्यक्त करतांना म्हटले… कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक रुपेशकुमार नागालगावे,  तेगा एस.पावरा, लक्ष्मीपुत्र उप्पीन, दशरथ पावरा तसेच विध्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
सूत्रसंचालन बालसंसद उपमुख्यमंत्री कु. मोगी अंधाऱ्या पावरा हिने केले तर  बालसंसद मुख्यमंत्री कु. मनिषा रमेश पावरा हिने आभार मानले…..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button