Amalner

?️ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकां साठी माजी आमदार साहेबराव पाटील यांची गांधीगिरी…..

?️ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकां साठी माजी आमदार साहेबराव पाटील यांची गांधीगिरी…..

कायद्याच्या अमलबजावणी साठी माजी आमदार रस्त्यावर पोलीस कर्मचारी यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून गांधीगिरी करत माजी आमदार साहेबराव पाटील सातत्याने कार्यरत आहेत.

प्रतिनिधी नूरखान

अमळनेर तालुक्यात तसेच जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.या पार्श्वभूमीवर गेल्या सोमवार पासून कडक लॉक डाऊन ची घोषणा मा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली आहे.संपूर्ण अमळनेर शहरात रस्त्याने विनाकारण जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी उच्छाद मांडला आहे. नागरिक जुमानत नसल्याने आता माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनीच आपल्या बंगल्या बाहेरील रस्त्यावर जणजागृती केली.त्यांनी रस्त्यावर उतरून जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकी वाहनांवरही एकच चालक जावे असे आदेश असल्याचे दुचाकी स्वारांना दाखविले.

पोलिसांनाही हा आदेश समजावून सांगितले.ज्यात अत्यावश्यक 8सेवा सोडून 21 गोष्टींवर प्रतिबंध आहे.याबाबत सर्वाना समजावून सांगण्या करिता रस्त्यावर उतरून कायद्याचे पालन न करणार्यांना पुष्प गुच्छ देत त्यांचे सत्कार करून गांधीगिरी केली.तर त्यांच्या याच गांधीगिरी ला लक्षात घेता पोलिसांनीही कठोर कार्यवाहीचा बडगा उचलत दंड आकारले.
दरम्यान बंदोबस्त चोख ठेवत कायद्याचे पालन जो करत नाही.त्यांचेवर कडक कार्यवाह्या कराव्या असे आदेश पो उ नि गणेश मुरे यांना चाळीसगांव परिक्षेत्राचे उपअधीक्षक सचिन गोरे,उपविभागीय अधिकारी सौरभ अग्रवाल पोलीस निरीक्षक अंबादास मोरे तहसीलदार मिलिंद वाघ पोलीस नायक शरद पाटील यांनीही या ठिकाणी दिलेल्या आदेशानुसार कठोरपणे अंमलबजावणी करन्याय यावी असे सांगितले.
त्यांनंतर माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या कडून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क व सेनीटायझर देण्यात आले.

१ ) अमळनेर क्षेत्रातील प्रभाग मध्ये कोणतेही वाहन विना परवाना फिरणार नाही .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button