Mumbai

सावधान ! पुण्यासह ‘या’ नऊ जिल्ह्यात येत्या 2 दिवसांत मुसळधार पाऊस.. रेड अलर्ट जारी

सावधान ! पुण्यासह ‘या’ नऊ जिल्ह्यात येत्या 2 दिवसांत मुसळधार पाऊस.. रेड अलर्ट जारी

मुंबई : संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट माथ्याच्या परिसरात ढगांची दाटी अजूनही कायम असून येत्या तीन ते चार तासांत मुसळधार पावासाची शक्यता आहे, असं ट्विट भारतीय हवामान विभागानं केलं आहे. यासोबतच १९ ते २३ जुलै या कालावधीत राज्यात विविध ठिकाणी रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सध्या मान्सुन पुन्हा एकदा जोरदार बॅटींग करत असताना मुंबईसह महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर व रायगड या जिल्ह्यांना आज हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाकडुन या 9 जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्यापासुन सलग 4 दिवस महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढलेली आहे. जुलै महिना अर्धा संपला तरी राज्याच्या अनेक तालुक्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पावसाने अशीच पाठ फिरवली तर पिण्याच्या पाण्याची समस्याही उद्भवू शकते.
राज्यातील 13 तालुक्यात 25 ते 50 टक्केच पाऊस झाला आहे. यात नाशिक जिल्ह्यातील 5 तालुके आणि नंदुरबार जिल्ह्यातील 6 तालुक्यांचा समावेश आहे. 33 तालुक्यात 50 ते 75 टक्के पाऊस झाला आहे. तर 309 तालुक्यात 75 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button