फैजपुर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटील सन्मानित.
सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपुर तालुका यावल
फैजपुर पोलीस स्टेशन येथे वार्षिक तपासणी अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉ.कृणाल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस पाटलांची मीटिंग घेण्यात आली. यावेळी गाव निहाय माहिती घेऊन पोलीस पाटील यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या त्यात प्रत्येक गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे. शेतीमालाच्या होणाऱ्या चोरी. गावात फिरणारे फिरते विक्रेते. अनोळखी इसम इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच मागील वर्षभरात चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या पोलीस पाटलांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यात सुरेश खैरनार पाडळसे. नरेश मासोळे मारूळ. तुषार चौधरी आमोदे. रवींद्र साळवे चिखली. हरीश चौधरी पिंपरूड.सौ. प्रफुल्ला चौधरी म्हैसवाडी. यांना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कृणाल सोनवणे यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले यावेळी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलिस अधिकारी श्री सिद्धेश्वर आखेगावकर, पोलीस उपनिरीक्षक श्री मोहन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक शेख साहेब, सहायक फौजदार हेमंत सांगळे, गोपनीय शाखेचे योगेश दुसाने सह संपूर्ण पोलीस स्टाफ व फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व पोलीस पाटील उपस्थित होते






