Amalner:कंजरभाट समाजाचे शासकीय अडचणी सोडविण्याा संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
अमळनेर कंजरभाट समाजाचे शासकीय अडचणी सोडविण्याा संदर्भात,जातीच्या दाखल्यांसाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात आम्ही खाली सहया करणारे समाजाचे क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते सुशिक्षित तरुण ज्येष्ठ नागरिक व कंजारभाट समाज विकास कृती समितीचे पदाधिकारी आपणांस निवेदन देतो की
१. कंजारभाट समाज हा उपेक्षित समाज असून विमुक्त जमाती या वर्गात सामाविष्ट आहे.
२. कंजारभाट समाज हा क्रिमिनल ट्रॉइबज अॅक्ट १८७१ अनव्ये जन्मत: गुन्हेगार ठरविण्यात आला व कोठेही अपराध झाला तर कंजारभाट समाजाच्या पानांवर / वस्त्यांवर पोलीस जावून त्यांनी गुन्हा केला असो व नसो त्यांना अटक करतात. असा हा जन्मतः गुन्हेगारी शापित समाज आहे.वरील संदर्भानुसार शिंदे साहेबांना कार्यालयात बोलावून (जातीचा दाखला साठी) १९६१ जाचक अट रद्द कशी होईल या साठी सखोल चर्चा केली आणि चर्चेतून संबंधित अधिकारी वर्गाने सगळ्या गोष्टीची विचार करून लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यासाठी कार्यालयीन बैठीकीचा प्रस्ताव कृती समितीला देण्यात आला. तत्पूर्वी राज्यभरात जर जर कुठल्याही समाजबांधवाना कंजारभाट जातीचा दाखल्याच्या कामासाठी किंवा इतर शासकीय अडचण भासल्यास व्यक्तिगत संपर्क नंबर देवून संपर्क करण्यास परवानगी देखील दिली आहे आणि आश्वासन दिले की आम्ही सबंधित अधिकारी वर्गाशी बोलून तुम्हाला ताबडतोब दाखले प्रदान करू आपणांस या निवेदनाद्वारे विनंती करीत आहे आपण निवेदनस्वीकारून लवकरात लवकर धोरणात्मक कारवाई करावी.
सदर निवेदनावर खालील पदाधिकारीच्या सह्या आहेत.श्रावण बाडूंगे,सरजु अभंगे,राहुल कंजर, टोनी बागडे,गोकूळ बागडे, राकेश अंभगे,आकाश तामचिकर,प्रेम बागडे,राहुल बाडूंगे, अक्षय बाडूंगे,लकी बाडूंगे ,सूरज्ञ अंभगे,दिनेश बागडे,विकास टिलंगे,विशाल कंजर,दिनेश बाडूंगे ,पंकज टिलांगे, राकेश बा, नितीन बागडे,हिम्मत बागडे,सचिन बागडे, योगेश अभंगे,महेंद्र गुमाने ई च्या सह्या आहेत.






