India

Shocking: अवघ्या 90 दिवसांच्या बाळाला तीन वेळा हार्ट अटॅक…! काय सांगितलं डॉ नी कारण..!

Shocking: अवघ्या 90 दिवसांच्या बाळाला तीन वेळा हार्ट अटॅक…! काय सांगितलं डॉ नी कारण..!

गेल्या काही दिवसांमध्ये हार्ट अटॅकच्या घटना झपाट्याने वाढल्या आहेत. हार्ट अटॅकच्या प्रकरणांमध्ये अगदी तरूणांपासून ते वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. अगदी चालता-बोलता, जिममध्ये वर्क आऊट करताना, काहींना तर चक्क आनंदाच्याक्षणीही हार्ट अटॅक आला आहे. यामुळे या प्रकरणांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातल्या नागपुरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अवघ्या ९० दिवसांच्या नवजात बाळाला तीनवेळा हार्ट अटॅक आला आहे. या प्रकरणाने सगळेच जण हादरून केले आहेत. आतापर्यंत जो वृद्धांचा किंवा वाढत्या वयातील आजार मानला जात होता त्याची वयोमर्यादा कमी होत चालली आहे. तरूणांमध्ये दिसणारा आजार आता नवजात बालकांमध्येही दिसत आहे.
या बाळाचा जन्म दिल्या गेलेल्या वेळे आधी झाला असून त्याला NICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं. या प्रिमॅच्युअर बेबीला श्वास घ्यायला त्रास होत होता. तसेच निमोनियामुळे बाळाचे फुफ्फुसही थोडे डॅमेज झाले होते. बाळाला दोन आठवडे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ९० दिवसांच्या या बाळाला तीन वेळा हृदय विकाराचा झटका येऊन गेला.

अशी हाताळली परिस्थिती

महत्वाचं म्हणजे बाळाला जेव्हा तीन हृदयविकाराचे झटके आले तेव्हा तो रूग्णालयातच होता. त्यामुळे डॉक्टरांनी तात्काळ उपचार केले. आता बाळाची परिस्थिती चिंताजनक नाही. त्याच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

डॉक्टरांनी सांगितलं की, वेळेआधी जन्म झालेल्या मुलांमध्ये हा धोका असतो. आईच्या पोटातच बाळाला संक्रमण झाल्याचा धोका असतो. किंवा प्रिमॅच्युअर जन्मल्यानंतर संक्रमण पसरण्याचा धोका देखील अधिक असतो. यामुळे वेळेआधी जन्मलेल्या बाळांची काळजी अधिक घेणे गरजेचे असते.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या नवीन संशोधनानुसार, अकाली जन्मलेल्या मुलांची ह्रदये जन्मानंतर वेगळ्या पद्धतीने विकसित होतात आणि प्रौढावस्थेतही ती वेगळी असतात. संशोधकांनी अनेक अभ्यासातून डेटा गोळा केला ज्यामध्ये नवजात, अर्भकं, मुले, किशोरवयीन आणि तरुण प्रौढांमधील हृदयाची कार्यक्षमता पाहिली गेली आणि प्री-टर्म आणि पूर्ण मुदतीच्या जन्मलेल्या लोकांच्या डेटाची तुलना केली.

NCBI ने दिलेल्या माहितीनुसार २५ ते ३२ आठवड्यांमध्ये जन्मलेल्या प्रिमॅच्युअर बेबींना हृदयविकाराचा धोका अधिक असतो.

डॉक्टरांनी सांगितलं कारण

हे प्रकरण जन्मानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या अकाली बाळाचे आहे. बाळाला संसर्ग झाल्यामुळे त्याला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. या प्रकरणाविषयी डॉक्टरांनी सांगितले की, बाळाला 3 वेळा हृदयविकाराचा झटका आला. हे आजारी बाळांमध्ये वारंवार दिसून येते आणि सर्वात सामान्य कारण म्हणजे तीव्र अनियंत्रित संसर्ग. या बाळाला सीपीआरची आवश्यकता असू शकते. वास्तविक हृदयविकाराचा झटका आलेल्या प्रौढ लोकांच्या तुलनेत ही परिस्थिती वेगळी आहे जिथे हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो कारण कोरोनरी आर्टरी ब्लॉकेज असते, अशी माहिती डॉ. स्वाती गारेकर यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button