Aurangabad

गोगाबाबा टेकडी बनवणार ऑक्सिजन हब; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण….

गोगाबाबा टेकडी बनवणार ऑक्सिजन हब; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण….

औरंगाबाद : शहरातील भावसिंगपुरा परिसरातील गोगाबाबा टेकडीवर जागतिक पर्यावरण दिनी 05 जून सुमारे 6 हजार 250 देशी प्रजातींची रोपे जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहेत. यामुळे हा भाग ऑक्सिजन हब बनेल. त्याचबरोबर साताऱ्यातील कास पठाराच्या धर्तीवरच विविध फुलांच्या रोपांची लागवड टेकडी परिसरात करून हा भाग झकास पठार करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाचा असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज सांगितले.

तसेच नागरिकांनी 5 जून रोजी वृक्ष लागवड कार्यक्रमात कोरोना विषाणूच्या सर्व नियमावलींचे पालन करत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनातून गोगा बाबा टेकडी परिसर अजून हिरवागार करण्याचा मानस प्रशासनाचा आहे. पालकमंत्री श्री. देसाई यांच्या पुढाकरातून सामाजिक वनीकरण विभागांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून वनरोपन संवर्धन दर्जा कमी असलेल्या वनांत पुर्नरोपन करण्याच्या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील गोगाबाबा टेकडी येथे दहा हेक्टर जागेवर रोपांची लागवड करण्यात येणार आहे.

या रोप लागवडीत देशी प्रजातींना महत्त्व देण्यात आले आहे. यामध्ये वड, पिंपळ, उंबर, जांभूळ, पापडा, बांबू, आंबा, रामकाठी बाभूळ, हिवर, निम, शिसू, खैर, पळस, आमलतास, शिरस आदी प्रजातीचा प्रामुख्याने समावेश करण्यात आलेला आहे.

या रोपांचे तीन वर्ष संवर्धन शासनामार्फत करण्यात येणार असून वृक्षांच्या संवर्धनासाठी तारांचे कुंपन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून सातारा येथील कास पठाराच्या धर्तीवर झकास पठार तयार करण्यात येणार असल्याचेही श्री. चव्हाण यांनी सांगितले. जिल्हा परिषदेतील अधिकारी कास पठार येथे भेट देऊन तेथील विविध प्रजातींची लोभनीय फुलांची रोपे, बी आणणार असल्याचेही ते म्हणाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button