चोपडा महाविद्यालयाच्या कुंदन पाटीलची गणित विषयात बाजी
प्रतिनिधी लतीश जैन
चोपडाः येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला ,शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाचा इयत्ता 12 वी विज्ञान वर्गाचा विद्यार्थी कुंदन रविंद्र पाटील फेब्रुवारी/मार्च 2020 एच एस सी परीक्षेत गणित विषयात 100/100 गुण मिळवून नाशिक विभागात गणित विषयात सर्वप्रथम येत, शेतकरी कुंटुंबातील कुंदनने संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात कनिष्ठ महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर टाकली आहे. चोपडा महाविद्यालयास हा मान दुसर्यांदा मिळत आहे.या यशाबद्दल कुंदनचे, त्याच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अॕड संदीप पाटील , उपाध्यक्ष सौ आशा पाटील, सचिव डाॕ स्मिता पाटील , प्राचार्य डाॕ डी ए सुर्यवंशी , उपप्राचार्य प्रा डाॕ ए एल चौधरी , डाॕ व्ही टी पाटील, डाॕ के एन सोनवणे, प्रा एन एस कोल्हे , ज्यु.काॕलेज उपप्राचार्य प्रा बी एस हळपे , रजिष्ट्रार डी एम पाटील यांनी अभिनंदन केले.






