Kolhapur

सर्वांनी सामाजिक ऐक्य जपूया-सहायक पोलिस निरिक्षक संगीता पाटील

सर्वांनी सामाजिक ऐक्य जपूया-सहायक पोलिस निरिक्षक संगीता पाटील

सुभाष भोसले-कोल्हापूर
सोशल मिडीयातून प्रसरणाऱ्या अफवेवर विश्वास न ठेवता शांतता राखूया व सामाजीक ऐक्य जपूया असे आवाहन सहाय्यक पोलिस निरिक्षक संगिता पाटील यांनी केले.
त्या साळवण (गगनबावडा) पोलिस चौकी येथे गगनबावडा पोलिस ठाणेच्या वतीने आयोजित शांतता समिती बैठकी प्रसंगी बोलत होत्या.
राममंदिर व बाबरी मस्जीद या संवेदनशील विषयावर पुढील आठवड्यात होणाऱ्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर गगनबावडा तालुका पोलिस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीची बैठक आयोजित आली होती.

आठवडा भरात होणाऱ्या राम मंदिर व बाबरी मस्जीद या विषया संदर्भात असणारा वाद हा दिवाणी असून तो कोणत्या जाती धर्माचा नाही,त्यामुळे निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरी,त्याचे बरे वाईट परिणाम समाजावर न उमटता कायदा व व्यवस्था राखली जावी असेही आवाहन करण्यात आले.
यावेळी सर्जेराव खाडे यांनी गगनबावडा तालुका हा सामाजिक एकतेचे प्रतिक असून तालुकयात आजपर्यंत कोणत्याही कारणास्तव जातीय व धार्मिक तेढ झाली नसल्याचे सांगून गगनबावडा तालुक्यामध्ये अनूचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली.

यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक संगिता पाटील, सर्जेराव खाडे माजी उपसरपंच अमिन फकीर,सहाय्यक फौजदार श्रीकांत मोरे,महादेव खाडे, पो.कॉ. जगदीश वीर,पोलिस पाटील प्रार्थना सोनार,बाजीराव पाटील, ताजूउद्दीन तरटे,हिंदु जनजागरणचे कार्यकर्ते व मुस्लीम धर्म प्रसारक उपस्थित होते.

साळवण : येथील पोलिस येथे शांतता समिती बैठक प्रसंगी बोलताना सहाय्यक पोलिस निरीक्षक संगिता पाटील सोबत सहाय्यक फौजदार श्रीकांत मोरे,महादेव खाडे,सर्जेराव खाडे,अमिन फकिर व अन्य

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button