Nashik

अमेरिकन राजदूताचा नाशिकच्या गोदाघाटावर हेरिटेज वॉक …

अमेरिकन राजदूताचा नाशिकच्या गोदाघाटावर हेरिटेज वॉक …

प्रतिनिधी : शांताराम दुनबळे नाशिक .

नाशिक : अमेरिकन राजदूत डेव्हिड रान्झ हे पत्नीसह नाशिकमध्ये आले आहेत. त्यांनी नाशिक शहरातील प्रसिद्ध बौध्द लेणी पांडवलेणीसह पंचवटीतील श्री काळाराम मंदिर, नारोशंकर मंदिर, गंगा गोदावरी मंदिर व गोदाघाटावर फेरफटका मारला.काळाराम मंदिराचे विश्वस्त महंत सुधीरदास पुजारी यांनी या दांपत्याला मंदिरांचा सुमारे सात हजार वर्षांचा इतिहास, पंचवटीत प्रभू श्रीरामचंद्र यांचा चौदा वर्षांचा वनवास काळ, सिंहस्थ कुंभमेळा माहिती इंग्रजीमध्ये दिली. ही सगळी माहिती ऐकून हे दांपत्य खूप प्रभावित झाले. आता आम्ही नाशिकच्या प्रेमात पडलो असून, पुन्हा नाशिकला आवर्जून येणार असल्याचेही या वेळी ते म्हणाले. गंगा गोदावरी मंदिरात त्यांनी सपत्नीक पूजा व अभिषेक केला.या वेळी त्यांनी अत्यंत स्पष्ट व शुद्ध संस्कृतमध्ये संकल्प सोडत मंत्रोच्चार केला. या वेळी आश्चर्यचकित झालेल्या उपस्थितांपैकी काहींनी त्यांना संस्कृतबद्दल विचारले असता, मी संस्कृतचा अभ्यास करत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी पुरोहित संघाच्या वतीने रान्झ यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या दांपत्याने उपस्थितांसमवेत सेल्फीही घेतले. याप्रसंगी त्यांच्यासोबत कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात होती. या वेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, पंडित अतुल शास्त्री गायधनी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button