अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना “प्रसाद” देऊनही मनमानी आणि हिटलरशाही
अमळनेर (प्रतिनिधी) सफाई कामारांच्या मुलांना वारसदार म्हणून नोकरी लवाण्याच्या शासन स्विकृत मे. लाड कमेटी च्या शिफारशी प्रमाणे नामनियुक्त वारसाला 30 दिवसाच्या आत नेमणूक करणे आवश्यक असतानाही न्यायालयाचा कोणातीही स्थिगिती आदेश नसताना नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर या आपल्या हट्टी मनमानीपणे आणि हिटलरी वृत्तीने नेमणूक देत नसल्यामुळे या अन्यायाच्या विरोधात नगरपालिकेचे दोन सेवानिवृत्त सफाई कर्मचारी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापासूनच आमरण उपोषणाला बसणार आहेत.
अमळनेर नगरपरिषदेतील सफाई कामगार अजय वंसत चव्हाण आणि प्रेमचंद खैरुदास चव्हाण हे अनुक्रमे दिनांक.१६/११/२०१८ व दिनांक ३१/०१ / २०१९ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे शासन स्विकृत मे.लाड कमेटीच्या शिफारशीप्रमाणे नामनियुक्त वारसदारांना शासन निर्णयाप्रमाणे ३० दिवसांच्या आता नेमणूक देण्याचे बंधनकारक आहे. दोन्ही कामगारांना शासन अथवा मा.न्यायालयाचा कोणताही स्थगिती आदेश नसताना दोन्ही सफाई कामगारांच्या वारसांना आपल्या न्यायासाठी वारंवार लढावे लागत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून वरील कर्मचारी सनदशीर पद्धतीने अर्ज विनंत्या करून नेमणुकी च्या आदेशाची वाट पाहत आहेत. परंतु मुख्याधिकारी यांना असलेला पदाचा गर्व आणि सत्तेचा माज यामुळे त्यांनी शासन निर्णयाची देखील पायमल्ली करून नेमणुका देण्यास टाळाटाळ केली आहे .
मुख्याधिकाऱ्यांचे डावे उजवे हात आस्थापना व प्रशासन लिपीक नितीन खैरनार आणि विजय बागुल यांना सुमारे ७ ते ८ महिन्यापांसून सतत विनंती करून नेमणुकाबाबत विचारणा केल्यानंतर खैरनार यानी, सीओ मॅडमला काही तरी द्यावी लागेल ” पुजापत्री करावी लागेल ” त्याशिवाय तुमचे काम होणार नाही “. त्यामुळे आम्ही मोठ्या आशेने खैरनार यांना ” काही तरी आणि पुजापत्री”प्रसाद देऊनही आमचे काम झाले नाही यामुळे आम्ही आमच्या न्याय हक्काच्या व शासनाने दिलेल्या अधिकारापासून वंचित आहोत .सुमारे ८ ते ९ महिन्यापासून होणारी उपासमार टाळण्यासाठी “मुख्याधिकारी व बेणेधारक काही तरी ” च्या हुकूमशाही व मनमानी कारभारास त्रासून १५ ऑगष्ट -२०१९ पासून नगरपालिका कार्यालयात आमची मागणी मान्य होईपर्यत बेमुदत आमरण उपोषणास बसत आहोत. याबाबत होणा-या सर्व परिणामास प्रशासनासह ( खैरनार )” जबाबदार राहतील, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये निवृत्त सफाई कर्माचार अजय चव्हाण आणि प्रमेचंद चव्हाण यांनी कळवले आहे.







