India

?Big Breaking…’ह्या’ वेळेत गुगल पे, फोन पे इ UPI अ‍ॅपचा वापर करू नका.. NPCI चे आवाहन..

?Big Breaking…’ह्या’ वेळेत गुगल पे, फोन पे इ UPI अ‍ॅपचा वापर करू नका.. NPCI चे आवाहन..

डिजिटल व्यवहारांवर केंद्र सरकारने जोर दिल्यापासून UPI द्वारे नागरिकांकडून व्यवहार वाढले आहेत.

पेटीएम, गुगल पे, फोन पे यांसारख्या अनेक UPI अ‍ॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

पुढील काही दिवस UPI पेमेंटमध्ये समस्या जाणवू शकते, अशी महत्त्वाची माहिती युजर्सना नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) दिली आहे.

युपीआय पेमेंटच्या सेवेमध्ये रात्री 1 ते 3 वाजेदरम्यान समस्या जाणवू शकते. ही समस्या पुढील काही दिवस जाणवेल. त्यानुसार युपीआय व्यवहारांचे ग्राहकांनी नियोजन करावे असे NPCI ने सांगितले आहे.

यादरम्यान सिस्टिम अपग्रेडचे काम केले जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. NPCI ने ही माहिती ट्विटरद्वारे दिली आहे.

नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने ही समस्या किती दिवस जाणवेल हे मात्र सांगितले नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button