Bodwad

साळशिंगी येथे लोकसंघर्ष मोर्चाच्या शाखेची स्थापना

साळशिंगी येथे लोकसंघर्ष मोर्चाच्या शाखेची स्थापना

जितेंद्र गायकवाड

साळशीगी. दि.02 लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सौ प्रतिभाताई शिंदे यांनी केले शाखेचे उद्घाटन.जळगाव जिल्ह्यात कर्मभूमी असलेल्या लाखो दलित ,आदिवासी ,वंचित ,ओबीसी ,इतर यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी माननीय ताईसाहेब सज्ज झालेल्या आहेत.

वंचिताच्या न्यायाला नेहमी वाचा फोडण्यासाठी त्या तयार आहेत.ज्या लोकांकडे जीवन जगण्याचा साठी कोणताही मार्ग नाही त्या लोकांना शेती विषयक मार्गदर्शन ,पडीक जमिनी ज्या जमिनी सरकारकडे पडून आहेत ह्या आदिवासी ,दलित यांना मिळाव्या म्हणून त्या सदैव प्रयत्न करत आहेत शाखेच्या उद्घाटन प्रसंगी सचिन भाऊ धांडे ,विनोद भाऊ देशमुख, महेंद्र भाऊ गायकवाड ,वामन भिल, शांताराम गायकवाड ,बारसू गायकवाड, संजय गायकवाड, गणेश बिल, किसन पवार, कडू पवार, साहेबराव पवार ,सुभाष राऊत ,रेशमाबाई गायकवाड ,रजाबाई गायकवाड,गुंफाबाई गायकवाड, जंगलु भिल ,तसेच गावकरी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button