Mumbai

उद्यापासून म्हणजे 16 तारखेपासून नवीन नियमावली जारी…!पहा काय आहेत नियम…!

उद्यापासून म्हणजे 16 तारखेपासून नवीन नियमावली जारी…!पहा काय आहेत नियम…!

मुंबई गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णसंख्या वाढत आहे तसेच नवीन ओमियोक्रॉन ह्या विषाणूचा प्रादुर्भाव देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवीन निर्देश देत राज्य सरकारला पत्र लिहून सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत विशेष खबरदारी घ्यावी असं केंद्राने कळवलं आहे.
राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

काय आहे नियमावली..

  • सार्वजनिक वाहतूकीत केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबत मॉल, सभागृह, कार्यक्रम याठिकाणी लसीचे दोन डोस असलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून युनिवर्सल पास देण्यात आले आहेत. प्रवास करताना लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणं बंधनकारक करण्यात आले आहे.
  • 31 डिसेंबर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर नवीन आदेश जारी केले आहेत. 16 ते 31 डिसेंबर पर्यंत मुंबईत निर्बन्ध असणार आहेत. गुरुवार (दि.16) पासून 31 डिसेंबर पर्यंत मुंबईत कलम 144 लागू असणार आहे. त्यामुळे मोकळ्या ठिकाणी पार्टी करण्यास मज्जाव असणार आहे.लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेल्यांनाच हॉटेलमध्ये पार्टीला एन्ट्री असणार आहे. 50 टक्के क्षमतेने हॉटेल (Hotel), बार (Bar) सुरु राहतील. यासाठी पूर्ण हॉटेल स्टाफचे लसीकरण आवश्यक असणार आहे.
  • 31 डिसेंबर ची पार्टी आयोजित करताना पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.50 % पेक्षा अधिक गर्दी जमा करता येणार नाही.
  • 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी असेल त्यामुळे हॉटेल, पब हे 12 पर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी असण्याची शक्यता आहे.पण कदाचित ह्या नियमात बदल होऊ शकतो. तसेच जर एखाद्या ग्रुपला पार्टीचे आयोजन करायचे असेल तर पार्टीत सहभागी होणाऱ्या सर्वांचे कोरोना लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेले असले पाहिजेत, हे बंधनकारक आहे.
  • दुकान, अत्यावश्यक सेवांची दुकानं, मॉल, इव्हेंटसाठी येणाऱ्या व्यक्तींना लसीकरणाचे दोन डोस बंधनकारक असणार आहे.
  • या काळात वाहन चालकांनी देखील लसीचे दोन डोस घेतलेले असले पाहिजे.
  • राज्यभरात जर प्रवास करणार असाल तर एकतर तुम्ही लशीचे दोन डोस घेतलेले

असावेत अथवा 72 तासांपूर्वीच RT-PCR चाचणी केलेली असणे बंधनकारक

असणार आहे

  • रिक्षा,बस,टॅक्सी,कॅब मध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवास करता येईल.वाहनात मास्क न लावल्यास वाहन मालकास देखील 500 रु दंड असेल.
  • महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ला दोन डोस आवश्यक आहे.
  • मास्क न घातलेल्या व्यक्तीस 500 रु दंड आकारला जाईल.
  • राजकीय सभा तसेच कोव्हीड नियमांचे उल्लंघन केल्यास 50 हजार रु दंड आकारला जाईल.
  • भारत न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी 25 % लोक उपस्थित राहू शकतात.
  • दुकानात ग्राहकाने मास्क न लावल्यास दुकानदारास 10 हजार रु दंड तर मॉल मध्ये मास्क न लावल्यास मालकास 50 हजार रु दंड आकारण्यात येईल.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई असेल.
  • 6 फुटाचे अंतर ठेवत सोशल फिजिकल डिस्टनगसिंग चे पालन करणे आवश्यक असेल

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button