अमळनेर येथे उपविभागीय पोलीस अधीक्षक राजेंद्र ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी ठेवला चोख बंदोबस्त
अमळनेर
आज संपूर्ण देशात सामूहिक जनता बंद कोरोना विषाणू च्या वाढत्या प्रादुर्भावामुळेठेवण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे,जळगांव पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथे उपविभागीय अधिक्षक राजेंद्र ससाणे आणि पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चोख बंदोबस्त तैनात ठेवला.कायदा, सुव्यवस्था ,शांतता आबादीत ठेवण्याचे उत्कृष्ट कर्तव्य पार पाडले.
सकाळ पासूनच संपुर्ण पोलीस विभाग शहरात तैनात होते.स्वतः पोलीस निरीक्षक आपल्या सहकाऱ्यांसह गस्त घालून प्रत्येक ठिकाणी जाऊन नागरिकांना बाहेर न पडण्याचे,चेहऱ्यावर मास्क लावण्याचे,हात धुण्याचे आवाहन करत होते. आजचा बंद ऐच्छिक स्वरूपाचा असल्याने सामान्य नागरिकांना वेठीला धरणे योग्य नसल्याने योग्य पद्धतीने समजून सांगून नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात होते. वेळ प्रसंगी थोडा काठीचा धाक दाखवून अवखळ,हूड मुलांना पळविण्याचा प्रयत्न देखील केला जात होता.यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सदगीर,शरद पाटील, दीपक माळी, राहुल चव्हाण,मिलिंद भाऊ, इ पोलीस तत्परतेने तैनात होत. शासकीय पोलीस वाहनात हँड वॉश,मास्क इ ठेवण्यात आले होते. की जेणे करून गरजू व्यक्तीला ते देता येतील.

अमळनेर येथे लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेसे पोलीस दल उपलब्ध नाही त्यामुळे प्रत्येक वेळी बाहेरून पोलीस दल मागविले जाते.आजही बाहेरून बंदोबस्तासाठी पोलीस बांधव उपस्थित होते. आज सर्व पोलीस बांधवाबसाठी आशु नाव्हेल्टीज विशाल शर्मा तसेच सामाजिक कार्यकर्त्या,ठोस प्रहार च्या संपादिका पत्रकार प्रा जयश्री साळुंके यांनी सामाजिक बांधिलकी जपत पोलीस बांधवांसाठी चहा,बिस्कीट,पाण्याच्या बाटल्या इ ची व्यवस्था केली होती. ठिक ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलीस बांधवांना भेटून त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था केली.






