त्या वीज चोरी प्रकरणात इत्तेहाद एज्यु. सोसायटीला झाले दंड परंतु
वीज वितरण कडुन नाममात्र कारवाई
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा ता रावेर जि जळगाव येथे इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी च्या मालकीच्या इमारतीचे बांधकाम वर्ष भर आकोडे टाकुन वीज चोरी करण्याचे काम सुरू होते.या बाबत पुराव्यानिशी तक्रार झाल्या नंतर वीज वितरण कार्यालया तर्फे इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी च्या इमारती वर छापा टाकुन सरकारी वीज तारांवर टाकलेला आकोडा सर्वहीस वायर व इतर साहित्य जप्त करण्यात आले व कारवाई म्हणुन
*फक्त 13648/- रुपये*
आकारणी करण्यात आली. तक्रार दार यांनी दंडाची आकारणी बाबत प्रश्न उपस्थित केले असता सावदा वीज वितरण चे शहर कक्ष अभियंता श्री खांडेकर यांनी मुद्दयास बगल देऊन धमकी वजा उडवा उडवी ची उत्तरे दिली. सबब पुराव्यानिशी तक्रार वीज वितरण चे वरिष्ठांना करण्याचे तक्रार दार यांनी म्हटले आहे.
सावदा वीज वितरण कार्यालयाचा अजब कारभार
वीज चोरी प्रकरणी बहुतांश घटकांवर दंडातम्क कारवाई रुपी हजारो रुपयांचे दंड आकारणे बाबत ऐकुन व वाचुन आहे.परंतु या वीज चोरी प्रकरणात सावदा येथील कार्यालयाचा अजब कारभार दिसुन आला आहे.






