चाळीसगाव तालुक्यात उद्या आधार कार्डाशिवाय युरिया मिळणार नाही – पण आधार कार्ड वाले सगळेच शेतकरी असतील का ?
चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले
चाळीसगाव – बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चाळीसगाव तालुक्याला दि 22 रोजी होलसेल व किरकोळ असे मिळून 15 दुकानांवर युरिया उपलब्ध होणार आहे.
युरिया घेण्यासाठी आधार कार्ड सक्ती असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली असली तरी आलेला युरिया आणि शेतकऱ्यांची गर्दी त्यात आधार कार्डाची सक्ती आहे व विशेष म्हणजे सध्या लॉकडवून आहे आणि सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे असल्याने युरिया वाटपाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याची चिन्हे आहेत म्हणून यावर दुकानदार काय उपाययोजना करतात याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे,
आधार कार्ड घेऊन येणारा हा शेतकरी आहे का ? व शेतकऱ्यांनाच युरिया मिळेल का आता यावर चर्चा सुरू आहे म्हणून उद्या शेतकऱ्यांना च युरिया मिळावा यासाठी कृषी विभाग व दुकानदारांनी प्राधान्य द्यावे अशी चर्चा असून जे आधार कार्ड घेऊन युरिया घेण्यासाठी रांगेत उभे राहतील ते शेतकरी च आहेत का याची खात्री देखील होणे गरजेचे आहे, नाही तर शेतकरी ला भेटेल 2 गोणी व इतरांना मिळतील 10 गोण्या असे होऊ नये म्हणून हा युरिया प्राधान्याने शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.






