Indapur

निमगांव केतकीतही “शिवभोजन थाळी” ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन.

निमगांव केतकीतही “शिवभोजन थाळी” ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन.

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे:इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या रहदाळीच्या ठिकाणी ही आता “शिवभोजन थाळी” उपलब्ध झाली असून केवळ पाच रुपयामध्ये स्वादिष्ट असे जेवण आता या ठिकाणी मिळणार आहे. मंगळवार दि.०७ एप्रिल रोजी राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते तहसीलदार सोनली मेटकरी यांच्या उपस्थित या योजनेचा प्रारंभ करण्यात आला.

उध्दव ठाकरे यांनी गरजू व गरीबांसाठी खास शिवभोजन थाळी ची घोषणा केली होती. त्यानुसार २६ जानेवारी याची राज्यात काही शहरांत अंमलबजावणी सुरु झाली. पुढे ग्रामीण स्तरावर विस्तार वाढवण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून इंदापूर तालुक्यात बस स्थानक, कृषि उत्पन्न बाजार समिती व निमगांव केतकी आदी ठिकाणी ही योजना कार्यान्वित झाली आहे. यात दोन चपाती,भात, वरण आणि एक भाजी असा मेनू असून ती केवळ ५ रुपयात सकाळी 11 ते 3 यावेळेत ग्राहकांनासाठी उपलब्ध असणार आहे.

यावेळी पोलीस अधिक्षक बी. एन लातुरे, पोलीस नाईक खैरे, ग्रामविकास अधिकारी अमोल मिसाळ संदिप भोंग, तात्यासाहेब वडापुरे, रवी शेंडे, चंद्रकांत भोंग, महादेव शेंडे, अँड.सचिन राऊत, मच्छिंद्र चांदणे यांसह इतर मंडळी उपस्थितीत होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button