Maharashtra

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परंडा च्या वतीने गरजुंसाठी अन्नधान्याच्या किटचे वाटप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परंडा च्या वतीने गरजुंसाठी अन्नधान्याच्या किटचे वाटप

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

परंडा ( सा.वा ) दि.०२
कोरोना व्हायरस मुळे अनेक गोरगरीब लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, यानिमित्ताने अनेक लोकांचे रोजगार गेले आहेत भारत देशांमध्ये लॉकडाऊन असल्याने नागरिकांना बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. यानिमित्ताने परंडा मधील जे नागरिक रोज मोलमजुरी करतात व ज्याचे पोट हातावर असणार्‍या कुटुंबाचा उदरनिर्वाह करु शकत नाही.

अशा गरजू नागरिकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परंडा च्या वतीने आज दिनांक ०२एप्रिल रोजी परंडा शहरातील पाटील गल्ली व माळी गल्ली येथील रोजंदारी वर कामाला जाणाऱ्या कुटुंबांना व परांड्या मध्ये अडकलेल्या २३ राजस्थानी मजुरांना किराणा साहित्य व गहू तांदळाचे वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह लक्ष्मण गोरे, पोलीस कॉन्स्टेबल रामराजे शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा पर्यावरण गतीविधी संयोजक विशाल काशीद, शिवसेना युवा नेते रणजित दादा पाटील,कुणाल जाधव, तुकाराम गायकवाड, राजसाहेब पाटील व अनिकेत काशीद आदी उपस्थित होते.यानिमित्ताने परंडा तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी समोर येऊन असे कार्यक्रम हाती घेण्याची गरज असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button