Amalner

अमळनेर: देवगांव देवळी हायस्कूलमध्ये संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

अमळनेर प्रतिनिधी- देवगांव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूल मध्ये कर्मयोगी ,थोर समाज सुधारक, संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे जेष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण केले.
यावेळी शाळेचे शिक्षक आय आर महाजन, एस.के.महाजन, एच ओ माळी व शिक्षकेत्तर कर्मचारी एन जी देशमुख, संभाजी पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमात संत गाडगेबाबा हे कर्मयोगी संत होते त्यांनी समाजप्रबोधन करीत समाजातील जुन्या चालीरीती यावर प्रहार केला असे सांगितले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button