Chandwad

चांदवडला भावी नगरसेवकांची लगबग सुरू

चांदवडला भावी नगरसेवकांची लगबग सुरू

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : चांदवड नगरपरिषद आरक्षण सोडत निघाल्यानंतर आता भावी नगरसेवकांची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.काही उमेदवारांनी वैयक्तिक भेटीगाठी घेण्यास सुरुवात केलेली असून काहींनी सोशल मीडिया च्या माध्यमातून फोटो, व केलेल्या कामांची माहिती शेयर करण्यास सुरुवात केली आहे.चांदवड नगरपरिषद मध्ये 17 प्रभागांपैकी 9 ठिकाणी महिला आरक्षण असल्याने सध्याच्या काही नगरसेवकांची पंचाईत झालेली आहे.काहींनी स्वतःच्या घरातील महिला उमेदवार सोबत घेऊन जनसंपर्क सुरू केलेला असून काही नगरसेवक दुसऱ्या प्रभागातून उमेदवारी केल्यास यश मिळू शकेल की नाही याची चाचपणी करताना दिसून येत आहेत.
एकंदरीत सर्वच इच्छुक उमेदवारांनी आमदार,माजी आमदार व स्थानिक नेते यांच्याशी भेटीगाठी घेऊन उमेदवारी संबंधी साकडे घातल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
प्रथम नगराध्यक्ष श्री भूषण कासलीवाल हे अजूनही वेट अँड वॉच भूमिकेत दिसत असून अनेक इच्छुक त्यांच्याही संपर्कात असल्याचे चित्र दिसते.काही युवक वर्ग चांदवड शहर विकास आघाडी स्थापन करुन उमेदवार देणार असल्याचे युवकांमध्ये बोलले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button