Amalner: न प तर्फे रिड्युस, रियुज आणि रिसायकल” सेंटर सुरू..!
अमळनेर नगरपरिषदे मार्फत स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण,माझी वसुंधरा अभियान, कचरा मुक्त शहर अभियान, मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर अभियान अंतर्गत राजमुद्रा फाऊंडेशन, ढेकू रोड परिसरात २० मे पासून “रिड्युस, रियुज आणि रिसायकल” सेंटर म्हणजेच ‘थ्री आर’ केंद्र स्थापन करणेत आलेले आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने “मेरी लाईफ मेरा स्वच्छ शतहर”
अभियानाअंतर्गत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना “रिड्युस, रियुज आणि रिसायकल” सेंटर म्हणजेच थ्री आर केंद्र स्थापन करणेबाबत निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने अमळनेर शहरातील नागरिकांना आवाहन करणेत येते की, आपलेकडील निरुपयोगी वस्तु जसे कपडे, पादत्राणे, भांडी, पुस्तके, प्लास्टिकच्या वस्तु, शोभेच्या वस्तु, स्टेशनरी इ. प्रकारच्या वस्तु न.प. ३ आर केंद्रात जमा करावे. जेणेकरुन कच-याची निर्मिती कमी होईल, कचऱ्याचा पुर्नवापर
होईल किंवा कचऱ्यापासून नवीन वस्तु तयार केल्या जातील. त्यामुळे आपल्या शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडेल व आपले शहर स्वच्छ व सुंदर राहील. तसेच सदर वस्तू ह्या गरजू लोकांना वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी अमळनेर नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक तथा स्वच्छ सर्वेक्षण २०२३ चे नोडल अधिकारी युवराज चव्हाण, राजमुद्रा फाऊंडेशन चे अध्यक्ष श्याम पाटील, वाय. आर. बोरसे (निवृत्त कृषीआधिकरी), जयवंतराव पाटील (निवृत्त पुरवठा अधिकारी), शहर समन्वयक श गणेश गढरी, वॉर्ड मुकादम सागर पवार, मुकादम संतोष संदानशीव, अनंत संदानशिव, गौतम बिऱ्हाडे, योगेश पवार परीसरातील नागरिक व नगर परिषद सफाई कर्मचारी उपस्थित होते.






