Amalner

Amalner: पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात शरद खैरनारचा सत्कार

Amalner: पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात शरद खैरनारचा सत्कार

अमळनेर प्रतिनिधी
संरक्षण मंत्रालयात लिपिक पदी निवड झालेल्या शरद खैरनार तसेच शरदला प्रेरणा देणाऱ्या त्याच्या आईंचा सत्कार आज पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित पूज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे आयोजित करण्यात आला होता.
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयातील स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंह पवार यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते.
सत्कार प्रसंगी शरद खैरनार म्हणाले की जीवनात यश संपादन करायचं असेल तर भरपूर मेहनतीशिवाय पर्याय नाही माझे हे यश माझ्या आई वडील गुरुजन वर्ग मित्रपरिवार यांच्यामुळे मिळाले त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता , माझ्या यशामुळे निश्चितच माझी उंची वाढली आहे अनेक मान्यवरांनी माझा सत्कार करून पाठीवर कौतुकाची थाप ठेवली निश्चितच भविष्यात मला प्रेरणादायी ठरेल असे सांगितले शरदने आपल्या जीवनाची आप भीती सांगताना आईच्या डोळ्यातून अश्रू पाणवले.. मुलाचे यशाने आई आज धन्य झाली होती.. जीवनातील निराशा वाईट दिवस संपतील अशी मनामध्ये आस निर्माण झाली . स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांनी शरदला परीक्षेसंदर्भात प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. अध्यक्षीय भाषणात दिलीप सोनवणे म्हणाले, की जीवनात संपत्तीला महत्त्व नाही .आयुष्यात यश तुमची संपत्ती आहे ,म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी भरपूर मेहनत करा व आई वडील,शाळा, गाव, समाज यांचे नावलौकिक करा असे सांगितले..
वाचनालयाचे अध्यक्ष मा.दिलीप सोनवणे सचिव मा.प्रकाश वाघ तसेच जेष्ठ संचालक भीमराव जाधव मा.निलेश पाटील ,ऍडव्हॉकेट उपासनी सुमित धाडकर ,ईश्वर महाजन इत्यादि मान्यवरांच्या हस्ते शरद खैरनार व आईचा सत्कार करण्यात आला. यावेळी आरटीओ स्वप्नील वानखेडे टॅक्स असिस्टंट पूजा वानखेडे हे ही उपस्थित होते.
यावेळी स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंह पवार यांची एका संस्थेने विशेष पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button