Yawatmal

कोठारी शिवारात दोन अस्वलाचा विहिरीत पडून मृत्यू

कोठारी शिवारात दोन अस्वलाचा विहिरीत पडून मृत्यू

विशाल मासुरकर

नांदगव्हाण बीट मधील कोठारी शिवारातील विहिरीमध्ये पडून दोन अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहेयवतमाळ जिल्ह्यातील – महागाव तालुक्यातील वन विभागाच्या नांदगाव बीट मध्ये येणाऱ्या कोठारी शिवारातील विहिरीमध्ये पडून दोनअस्वलांचा मृत्यू झालाची घटना दिनांक 16 रोजी सकाळी १२ वाजताच्या दरम्यान निदर्शनास आली दोन दिवसापूर्वी या शिवारामध्ये दोन अस्वलाने शेतकऱ्या वर हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला होता यामध्ये कोठारी शिवारातील शेतकरी शिवा संभा आढागळे यांच्या शेतातील विहिरीमध्ये दोन नर जातीचे अस्वल मृतावस्थेत आढळून आले . या घटनेची माहिती कोठारी येथील पोलीस पाटील किसन नांदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून कळविले असता .

उपविभागीय वनअधिकारी अमोल थोरात व वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे आपल्या टीमसह घटनास्थळी हजर झाले असून बाजेच्या साह्याने दोन्ही अस्वलाचे प्रेत बाहेर काढण्यात आले असुन सदर घटनेचा पंचनाम करण्यात आला . तसेच डॉ येवतीकर व डॉ .वाय.एस. पाटील हे घटणास्थळी पोहचून अस्वलाचे शवविच्छदन करण्यात आले असून यावेळी मानव वन्यजिव कोबरा एडवेंचर यवतमाळची टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली होती वनपरीक्षेत्र अंतर्गत मुडाणा बि. ए . खान तसेच क्षेत्र सहायक धारमोहा एस.एम. हक .व एस.एम. राठोड ङि व्ही . गांवडे वनपाल व इतर वनकर्मचारी घटनास्थळी हजर होते ,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button