शेतकरी आंदोलनाला एमआयएमचा जाहीर पाठींबा- सैय्यद रफअत हुसैन
फहीम शेख नंदुरबार
Nandurbar : 7 डिसेंबर देशभरातील शेतकरी कृषी कायद्याविरोधात दिल्लीत मागील 12 दिवसांपासून कडकडीत थंडीत आंदोलन करत आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. एमआयएमचे सुप्रीमो व लोकसभा खा.बैरिस्टर असदोद्दीन ओवेसी यांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका पक्षाची असुन शेतकरी संगठनां कळुन उद्या भारत बंद पुकारण्यात आला आहे, त्याला देशभरातील जेथे जेथे पक्षाचे यूनिट व पक्षावर प्रेम करणारे लोक आहेत त्या सर्व ठिकाणी सनदशीर मार्गाने होत असलेल्या आंदोलनात आमचा सहभाग राहणार असुन महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष खासदार सैय्यद इम्तियाज़ जलील व कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी यांच्या नेत्रूत्वात आम्ही राज्यात सदर आंदोलनास जाहीर पाठिंबा देत असल्याची माहिती लोक प्रहार न्यूजला नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष सैय्यद रफअत हुसैन यांनी दिली आहे.






