Amalner

देवगाव देवळी येथे महात्मा फुले जयंती निमित्ताने ग्रंथ वाटप-महात्मा फुले ब्रिगेड व युवक मित्र परिवाराचा संयुक्त उपक्रम

देवगाव देवळी येथे महात्मा फुले जयंती निमित्ताने ग्रंथ वाटप-महात्मा फुले ब्रिगेड व युवक मित्र परिवाराचा संयुक्त उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी नूरखान

तालुक्यातील देवगाव देवळी येथे महात्मा फुले यांच्या 193व्या जयंती निमित्ताने युवक मित्र परिवार व महात्मा फुले ब्रिगेड यांचा संयुक्त विद्यमाने फुले विचार ग्रंथ वाटप कार्यक्रम राबविण्यात आला.

महात्मा फुले जयंतीनिमित्त दरवर्षी आयोजित केला जाणारा कार्यक्रम या वर्षी कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आला होता.त्यामुळे औपचारिक स्वरूपात सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळत फुले विचार ग्रंथ वाटप कार्यक्रम राबविण्यात आला.सुरवातीला महात्मा फुले पुतळ्यास, प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.व नंतर घरोघरी जाऊन फुले विचारांचे पुस्तके प्रविण महाजन,पुणे यांचा मार्गदर्शनाने वाटप करण्यात आले.प्रसंगी महात्मा फुले ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी महाजन,उपसरपंच अनिल माळी, रावसाहेब माळी,दिनेश माळी,आदी.. उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button