महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर
चाळीसगांव प्रतिनिधी नितीन माळे
महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या नंतर दीर्घकाळ सलग मुख्यमंत्री पदावर असलेले तसेच लोकप्रिय, महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे मुख्यमंत्री #मादेवेंद्रजीफडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कॅप्टन कॉर्नर चाळीसगाव येथे युवानेते मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबीर घेऊन समाज उपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला.
या रक्तदान शिबिरात नगरसेवक भास्कर पाटील, मनोज गोसावी, तुषार चव्हाण, संजय पाटील, रोहन पाटील, उदय ठाकरे, रोहित कोतकर, राहुल पाटील, शुभम येवले, आबा चौधरी, गोपाल चौधरी, स्वप्नील यशोद, सुनील शिनकर यांच्यासह शेकडो तरुणांनी रक्तदान केले.
या शिबिराला सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण, भाजपचे सरचिटणिस प्रा.सुनील निकम सर, सौ.योजना चव्हाण, मुरलीधर बारकु पाटील, भरत गोरे, युवामोर्चा उपाध्यक्ष सचिन आव्हाड, बाळू मामा, अण्णा भाऊ गवळी, शांताराम पाटील, अरुण पाटील, दीपक राजपूत, खुशाल पाटील, शिवा मराठे, पुरुषोत्तम चौधरी, गौरव पाटील, जीवन सुरभी ब्लड बँकेचे दत्ता नागरे, प्रवीण पाटील, सौरभ पाटील, ललित महाजन, स्वप्नील माळी, गणेश पाटील, जगदीश चव्हाण, अरविंद पाटील, दीपक पाटील, तुषार बोतरे, नितेश पाटील, सोमनाथ चौधरी, प्रवीण मराठे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होती.







