आर्किड मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी
चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
यशोधन चारीटेबल ट्रस्ट संचलित ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर तृप्ती पाटील शाळेच्या प्राचार्य मिस परमेश्वरी उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्माष्ट मी निमित्त पिता पालकांसाठी मोहक मुरली डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत महावीर जैन यांचा प्रथम क्रमांक, सिद्धार्थ वाघमारे यांचा द्वितीय क्रमांक आणि चेतन कुमार जैन आणि तुकाराम लवटे यांचा तृतीय क्रमांक आला. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिनानिमित्त शाळेतील चिमुकले राधा आणि कृष्ण यांच्या वेशभूषेत आले होते विद्यार्थ्यांनी कृष्ण गीतांवर नृत्य सादर केले आणि मटकी फोडून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद घेतला कृष्णा च्या घोषणांनी सगळे वातावरण कृष्णमय बनले होते याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप केले दिपाली पाटील आणि लिपीका नागदेव यांनी सूत्र संचालन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितेश वाघ रिया कलानी, श्रद्धा देशमुख, सपना पवार अनिता पवार इत्यादी अथक परिश्रम घेतले.







