Amalner

?️ अमळनेर कट्टा… पातोंडा, मारवड व मांडळ प्रा आ केंद्रास विकास मंच कडून ऑक्सीजन कन्सन्ट्रेटर भेट

?️ अमळनेर कट्टा… पातोंडा, मारवड व मांडळ प्रा आ केंद्रास विकास मंच कडून ऑक्सीजन कन्सन्ट्रेटर भेट
पातोंडा ता.अमळनेर – पातोंडा व मारवड विकास मंच या सामाजिक संस्थांमार्फत पातोंडा व मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी 5 लिटर क्षमतेचे व मारवड प्राथमिक आरोग्य केंद्रास 7 लिटर क्षमतेचे ऑक्सीजन कन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले.
कोरोनाची वाढती महामारी व प्राणवायूची कमतरता या बाबींची गंभीरता लक्षात घेऊन ग्रामीण स्तरावर गरजू व गंभीर रूग्णांना मदत होईल ही बाब ओळखून पातोंडा व मारवड विकास मंचने जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ दिलीप पोटोडे यांच्या उपस्थितीत ऑक्सीजन कन्सन्ट्रेटर डाॅ संजय पाटील वैद्यकीय अधिकारी प्रा आ केंद्र पातोंडा, डाॅ संजय रनाळकर व डाॅ आदित्य पाटील वैद्यकीय अधिकारी प्रा आ केंद्र मारवड व डाॅ सागर पाटील प्रा आ केंद्र मांडळ यांच्या स्वाधीन करण्यात आले. सदर ऑक्सीजन कन्सन्ट्रेटर चा उपयोग आवश्यक रूग्णांकरीता करण्यात यावा तसेच वेळोवेळी या यंत्रांची देखभाल दुरूस्ती करून पातोंडा व मारवड विकास मंच च्या विश्वासास सार्थक ठरण्याची जबाबदारी सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांवर आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ दिलीप पोटोडे यांनी दिली. या प्रसंगी पातोंडा परीसर विकास मंचचे कपिल पवार वित्त लेखाधिकारी मनपा जळगाव , महेंद्र पाटील , विलास चव्हाण , भुषण बिरारी , रत्नाकर पवार व मारवड विकास मंच चे विजय भदाणे शाखा अभियंता सिन्नर , देवेंद्र साळुंखे, महेश साळुंखे, आशिष चौधरी , उमेश काटे व विजयसिंग पवार आदी उपस्थित होते.
फोटो – जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ दिलीप पोटोडे , वैद्यकीय अधिकारी प्रा आ केंद्र पातोंडा, मारवड व मांडळ यांना ऑक्सीजन कन्सन्ट्रेटर स्वाधीन करतांना पातोंडा व मारवड विकास मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते
रूंधाटी/राहुल पवार

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button