दिनांक २८ते३० ला नाशकात गुरुवार ते शनिवारदरम्यान ऑनलाइन रोजगार मेळावा ; व्हीसीद्वारे मुलाखती
प्रतिनिधी शांताराम दुनबळे
नाशिक-: नाशिक जिल्हा कौशल्य विकास, जिल्हा रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , नाशिक यांच्यातर्फे गुरुवार २८ मे ते शनिवार ३० मेदरम्यान ऑनलाइन पद्धतीने ‘ पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे . नोंदणीकृत उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहेत . सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे मागील काही दिवसांपासून अनेक औद्योगिक आस्थापना , व्यवसाय व उद्योग हे बंद होते . त्यामुळे सदर आस्थापनांमध्ये काम करणारे बरेचसे परप्रांतीय कामगार , मजुर हे त्यांचे गावी गेले आहेत किंवा जात आहेत . त्यामुळे मनुष्यबळाच होत आहे . आवश्यकता लक्षात घेता हा मेळावा या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे www . rojgar.mahaswayam.gov , in या वेबपोर्टलवर बघता येथील , यासाठी या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेनुसार व्हिसीद्वारे मुलाखती होणार आहेत . mahaswayam मोफत अॅप डाऊनलोड करून नोंदणी करावी , तसेच लॉगीन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अॅप्लाय करावे . भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे www . rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर Pandit Dindayal Upadhayay Job Fair ऑप्शन वर Clik करुन NASHIK ONLINE JOB FAIR – 1 ( 2020-21 ) यावर त्यांचेकडील रिक्तपदे अधिसूचित करावी . तसेच मनुष्यबळाच्या मागणीची जाहिरात व प्रसिद्धी विभागाच्या वेबपोर्टलवर विनामूल्य करावी . याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या ०२५३-२९ ७२१२१ या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा व या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने लाभ घ्यावा , असे आवाहन नाशिक विभागीय आयुक्तालयाचे उपआयुक्त सुनील सैंदाणे आणि कौशल्य विकास , रोजगार a उद्योजकता , नाशिकचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी केले आहे .






