Dewala

कसमादे परिसर विकास मंडळाकडुन गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कसमादे परिसर विकास मंडळाकडुन गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

महेश शिरोरे

देवळा तालुक्यातील खामखेडा येथे किराणा मालाच्या किटचे वाटप सरपंच संजय मोरे , व कसमादे परिसर विकास मंडळाचे संचालक आण्णा पाटील व प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरजू लाभार्थ्यांना करण्यात आले.
सध्या संपूर्ण देशात कोरोनाचा धुमाकूळ सुरु असून, गेल्या महिन्यापासून देशात लॉकडाऊन सुरु असल्यामुळे मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्या मजुरांपुढे जगायचे कसे असे मोठे संकट उभे राहिले होते अशातच चांदवड देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल आहेर व भाजपा नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली कसमादे परिसर विकास मंडळ विठेवाडी (लो) ता.देवळा यांच्याकडून गोरगरिबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाउन करण्यात आल्यामुळे तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे ही बाब लक्षात घेऊन आमदार डॉ.राहुल आहेर व भाजपा नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली कसमादे परिसर विकास मंडळ विठेवाडी (लो) ता.देवळा यांच्याकडून खामखेडा व सावकी तसेच देवळा तालुक्यातील गोरगरिबांना डाळ ,तांदूळ, गहू,सर्व प्रकारचे कडधान्य,तेल , मीठ अशा किराणा साहित्याचे वाटप चिंतामण चिमनपुरे , कुंदा भदाणे, म्हाळसाबाई पानपाटील, शांताबाई पाटोळे, गुजाबाई कांबळे, नरेंद्र बच्छाव ,दगा जाधव, आशा बऱ्याचशा गरजू लाभार्थ्यांना किराणा किट चे वाटप करण्यात आले.

यावेळी कसमादे परिसर विकास मंडळाचे संचालक पंढरीनाथ शेवाळे, सरपंच संजय मोरे, बापू शेवाळे, विजय सूर्यवंशी ,प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे, प्रशांत शेवाळे, भाऊसाहेब बोरसे, योगेश शिरोरे, इंग्लिश मीडियम अधीक्षक डी एम आहेर आश्रम शाळेची अधीक्षक प्रशांत पवार , स्वप्नील शेवाळे, राकेश बच्छाव,पाठक सर, विजय परदेशी सुनील बागुल, शरद पवार, राजू बागुल आधी कर्मचारी उपस्थित होते,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button