Amalner: ओ भो.. त्या सोसल मीडियावर काई माई व्हायरल करजात नका… नही तर..
जाहीर सूचना
अमळनेर पोलीस स्टेशन कडून अमळनेर शहर वासियांना कळविण्यात येते की, सोशल मीडिया च्या माध्यमातून विशेषता व्हाट्सअप ग्रुप मध्ये आक्षेपार्ह मजकूर टाकले (वायरल) जात आहेत. तरी गृप अडमिन व मॅसेज वायरल करणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी अमळनेर पोलीस स्टेशनला सुरू आहे. तरी अमळनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, कोणीही सोशल मीडियावर आक्षेपार्ह मॅसेज वायरल करणार नाहीत.
अमळनेर पोलीस स्टेशन






