Amalner

Amalner: अमळनेर येथे श्रामणेर प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमाचे उदघाटन

Amalner: अमळनेर येथे श्रामणेर प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमाचे उदघाटन

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व शहर शाखा अमळनेर यांच्या वतीने दि. १० ते १९ फेब्रुवारी दरम्यान बुद्ध विहार, प्रबुद्ध काॅलनी, अमळनेर येथे श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. याचा उद्घाटन कार्यक्रम १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष मा.डी.आर. सैंदाणे होते. भारतीय बौद्ध महासभा, भिक्खू संघाचे राष्ट्रीय महासचिव भन्ते बी.सुमेध बोधी यांच्या हस्ते श्रामणेर प्रवज्जा दिक्षा देण्यात आली. आदरणीय के.वाय.सुरवाडे (विभागीय सचिव) यांच्या मार्गदर्शनाखाली श्रामणेर शिबिर होत आहे. याप्रसंगी मा.युवराज नरवाडे (समता सैनिक दल लेफ्टनंट कर्नल), मा.अरुण तायडे (केंद्रीय शिक्षक), मा.मधुकर पगारे (जिल्हा कोषाध्यक्ष), मा.भिमराव सोनवणे, मा.प्रकाश सोनवणे (पर्यटन सचिव) मा.मोहिते सर साक्री, मा.आर.टी. साळवे, मा.डि.के.वाल्हे, मा.ए.टी.सुरळकर, मा.एस.टी.इंगळे, मा.रमेश पवार, मा.मिलिंद भालेराव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मा.प्रा.डाॅ. चंद्रकांत नेतकर (तालुका कोषाध्यक्ष) यानी श्रामनेर शिबिराचे महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन मा.अरुण घोलप (तालुका सचिव) यांनी तर आभारप्रदर्शन मा.मिलिंद निकम यांनी केले.
अमळनेर तालुका कार्यकारणी मा.ज्ञानेश्वर निकम (सरचिटणीस), मा.श्रीकांत खैरनार (कार्यालयीन सचिव), मा.संदीप सैंदाणे (हिशोब तपासणीस), मा.हरिभाऊ वाघ (उपाध्यक्ष), मा.पंचशीला संदानशिव (महिला उपाध्यक्ष), मा.राजेंद्र गायकवाड (सचिव), मा.धिरज ब्रह्मे (सचिव), मा.रत्नमाला नेतकर (महिला सचिव), मा.सुधा निकम (महिला संघटक) यांनी आयोजन योग्य प्रकारे केले.
अमळनेर शहर कार्यकारणी मा.बापूराव संदानशिव (शहराध्यक्ष), मा.एन.आर.मैराळे (सरचिटणीस), मा.देवदत्त संदानशिव (उपाध्यक्ष), मा.अर्जुन संदानशिव, मा.रविंद्र सोनवणे, डाॅ.हर्षलताई संदानशिव यांनी परिश्रम घेतले.
भोजनदान नगरसेविका मा.सविता योगराज संदानशिव आणि सामाजिक कार्यकर्ते योगराज (बाळासाहेब) संदानशिव यांचे कडून देण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button