Maharashtra

निभोंरा येथे सापडला पहिला कोरोना पॉजिटिव्ह

निभोंरा येथे सापडला पहिला कोरोना पॉजिटिव्ह

प्रतिनिधी संदीप कोळी

निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथे आज पर्यंत एकही रूग्न न व्होता परंतू दि.०६ जून रोजी एकजन पाँझेटीव्ह आला आहे. पहिलाच रूग्न निघाल्याने निंभोरा वासिय घबराहट मध्ये आहे. सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना निंभोरा गाव मात्र कोरोनामुक्त होते मात्र सोमवारी आलेल्या एका कोरोना रिपोर्ट मुळे बिनधास्तपणे वावरणार्‍या निंभोरा गावामध्येही भीतीचे वातावरण आहे.
निंभोरा स्टेशन भागातील हनुमान नगर भागात संबंधित रहिवाशांच्या घराजवळील गल्ली भागातील विभाग कंटेनर म्हणून घोषित करण्यात आला व निंभोरा ग्रामपंचायत प्रशासनाकळून तो सील करण्यात आला.
संबंधित इसमाची प्रकृतीही दोन-तीन दिवसांपूर्वी खालावली होती व त्याला गोदावरी हॉस्पिटल जळगाव येथे भरती करण्यात आले होते या दरम्यान त्याचा रिपोर्ट पॉझिटिवआल्याने गावात ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने संबंधित परिसर सील केला असून तो भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे व घरातील संबंधित इसमाची पत्नी मुलगी व नात यांना रावेर येथील कोविड सेंटर येथे पुढील आरोग्य तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
यावेळी निंभोरा ग्रामपंचायतीचे सरपंच डीगंबर चौधरी यांनी निंभोरा गावातील जनतेला संबोधित करून सांगितले आहे की कोणीही घाबरून जाऊ नये व आपल्या घरातून बाहेर निघू नये आपले मन सकारात्मक ठेवा. लवकरच संबंधित इसम हा या आजारावर मात करून घरी बरा होऊन येईल. व आपले गाव कोरोना मुक्त होईल. त्या साठी नागरीकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button