नागरिकांनी स्वतः काळजी घेणे गरजेचे:मुख्याधिकारी कदम
चांदवड उदय वायकोळे
अनलॉक केल्यापासून महाराष्ट्रात तसेच भारतात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे,चांदवड शहर काही या बाबतीत मागे नाही.जसे जसे अनलॉक सुरू झाले तसे तसे बाहेरगावी ,खरेदी,कामानिमित्त,व्यवसायानिमित्त जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.अनेक नागरिकांची खोळंबलेली कामे करण्यासाठी नाशिक, मालेगाव व इतर ठिकाणी नागरिक प्रवास करीत आहेत. चांदवड शहरात अनलॉक केल्यापासून कोरोना रुग्ण जुन्या संपर्कातील तसेच नवीन हळूहळू वाढत असल्याने नागरिकांनी आता स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे असे चांदवड नगरपरिषद चे मुख्याधिकारी श्री अभिजित कदम यांनी ठोस प्रहार च्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
मुख्याधिकारी कदम यांनी याअगोदर धुळे महानगरपालिका येथे सहायक आयुक्त पदावर काम केले असल्याने त्यांचा प्रशासकीय व स्वच्छता अभियान या अंतर्गत कामाचा अनुभव दांडगा आहे.शहरातील वॉर्डांमध्ये धूर फवारणी यंत्राद्वारे फवारण्या करण्यात आल्या असून पावसाळ्यात शहरात मोठ्या प्रमाणात डास मच्छर यांचे प्रमाण वाढत असून नगरपरिषद तर्फे पावडर,धूर फवारणी सुरू आहे.
चांदवड बस स्टँड समोरील मार्केट कमिटी गाळ्यांमध्ये सायंकाळी शेजारी असलेल्या अस्वच्छ नाल्यामुळे मोठ्या प्रमाणात डास येत असून तेथे धूर फवारणी व स्वच्छता व्हावी अशी अपेक्षा काही गाळाधारकांनी व्यक्त केली आहे.






