लोणंद प्रतिनिधी,
लोणंद येथे कोरोना चा फैलाव रोखण्यासाठी व मोकाट बाहेर फिरणारांचा बंदोबस्त करण्यासाठी लोणंद पोलिसांकडून दोन ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेण्यात आली आहे.
वारंवार विनंती करूनही लपून छपून का लोक रस्त्यावर येतच आहेत. यासाठी ते गल्लीबोळाचा वापर करत असल्याचे लक्षात आल्याने तसेच हा प्रकार नियंत्रणात आणण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ पोलिसांकडे उपलब्ध होणं शक्य नसल्याने संपुर्ण लोणंद शहरावर आता ड्रोनची नजर राहणार आहे. आता पोलिसांची नजर चुकवत गल्लीबोळाचा वापर करणारांना चांगलाच चाप लागणार आहे. विनाकारण घराबाहेर पडणारे तसेच गल्लीबोळातून घोळका करून एकत्र बसणारे आता ड्रोनच्या नजरेच्या टप्प्यात येणार आहेत. विनाकारण फिरताना सापडणारांवर अशा प्रकारे नजर ठेवून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष चौधरी यांनी सांगितले आहे. तसेच विनाकारण घराबाहेर कोणीही पडू नये व कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
फोटो
लोणंद पोलिसांकडून वापरण्यात येत असलेला ड्रोन.






