Kolhapur

ज्येष्ठ शिक्षणतज्ञ कै.डी.बी.पाटील यांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान नव्या पिढीला निश्चितच प्रेरणादायक ठरेल -माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार

ज्येष्ठ शिक्षणतज्ञ कै.डी.बी.पाटील यांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान नव्या पिढीला निश्चितच प्रेरणादायक ठरेल -माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार

सुभाष भोसले-कोल्हापूर
श्री दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूर ता. येथे कागल तालुक्यातील सर्व शाळांतील मुख्याध्यापकांच्या वतीने कै.डी.बी.पाटील यांच्या 85 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. माध्यमिक शिक्षणधिकारी किरण लोहार म्हणाले की,ज्येष्ठ शिक्षणतज्ञ कै .डी.बी.पाटील यांचे कोल्हापूर जिल्हयातील शैक्षणिक कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे त्यांचा वारसा सर्वांनी चालवावा.त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे त्यांचा आदर्श समोर ठेवून आपण शैक्षणिक वाटचाल केली पाहिजे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही.जी.पोवार होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी डॉ. जी.बी. कमळकर, शिक्षण विस्तार अधिकारी दयानंद माळी, आर.एस.गावडे, सौ.सारिका कासोटे, केंद्रप्रमुख सुनिता किणेकर, संचालक पी.व्ही.पाटील, तालुकाध्यक्ष एस.टी.चोगुले,शहाजी माने, अशोक बुगडे,जे.डी.पाटील, सौ. सुवर्णा माने, सौ.प्रभावती पाटील, सौ. राजश्री चौगुले, सौ.शाकिरा मुजावर, सौ.सुजाता माने, अनिल खामकर, अशोक वारके, ए.एन. पाळेकर, आर.जी.पाटील, यांच्यासह तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button