Rawer

सुकी नदीच्या पात्रात वाळू उपसा जोरात, शासन मात्र कोमात…

सुकी नदीच्या पात्रात वाळू उपसा जोरात, शासन मात्र कोमात…

ता.रावेर विलास ताठे

सुकी नदीच्या पात्रात वाळू उपसा व वाहतूक मोठ्या प्रमाणात राजरोसपणे सुरू आहे, कुंभारखेडा,चिनावल, वडगाव, वाघोदा , दसनूर याठिकाणाहून वाळु माफीया प्रशासनाचा कोणता धाक ना दराडा बाळगता अत्यंत निर्भर पणे रात्री साडे दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत ट्रॅक्टर ने मोठया संख्येने तसेच त्यांचे चालक ही मोठ्या वाहनांच्या फायरींग म्हणजे ध्वनी प्रदुषण करीत , सुसाट वेगाने बेकायदेशीर वाळू वाहतूक करीत आहेत,
यावेळी रात्री संबंधित गावकऱ्यांची ध्वनी प्रदुषणामुळे झोप मोडली जात असूनही,सदर वाळू वाहतूक साधनांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, तरी याविषयीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे
तसेच हे वाळू वाहतूकदार रात्री साधारण वाहनांना साइड पणं देतं नाहीत, त्याचप्रमाणे बांधकाम करणाऱ्या कडून हुकूमशाही पद्धतीने 2500 ते 3000 पर्यंत वाळू खेपेने पैसे उकळत आहे, तसेच या परिसरात प्रत्येक गावात एक-दोन एजंट त्यांनी पेरले आहेत,
याच दरम्यान दसनूर येथे उपसरपंच यांना वाळू माफिया कडून मारहाण करण्यात आली आहे, यासंबंधीची तक्रार संबंधित गावकऱ्यांनी रावेर तहसीलदार यांना निवेदनात नमूद केली आहे, आता निमभोरा सीम येथे दरड कोसळली आणि त्यात दोन तरुण ठार तर दोन जखमी झाले आहेत, याआधीही अशी घटना घडल्या आहेत, यावरुन वाळू माफिया यांचा हौदोस वाढला असून यापुढे प्रशासन मात्र हतबल झाले आहेत काय ?? असा प्रश्न उपस्थित होत आहे ??
कुंभारखेडा, चिनावल,वाघोदा, दसनूर परिसरातील नागरिकांची एकाच मागणी करण्यात येत आहे कि, लवकरात लवकर या वाळू माफिया वर कार्यवाही प्रशासन आणि संबंधित अधिकारी यांनी करावी,व शासनाच्या हजारोंच्या रुपये महसूल बुडतो आहे,तो याकडे गांभीर्याने विचार करावा..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button