Nashik

मुख्यमंत्र्यांनी व्हिडीयो कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या मिटिंगमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या शी चर्चा

मुख्यमंत्र्यांनी व्हिडीयो कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या मिटिंगमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या शी चर्चा

नाशिक प्रतिनिधी शांताराम दुनबळे

कोरोनाविरोधात झगडण्यासाठी मा.मुंख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी पुढाकार घेतला असला तरी महाराष्ट्रात कामगारांचे प्रश्न तीव्र झाले असताना महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांनी अधिक पुढाकार घेणे आवश्यक आहे.प्रवासी कामगारांना योग्य मार्गदर्शन झालेले नाही.त्यामुळे ते पोलिस स्टेशनवर फॉर्म भरण्यासाठी व डॉक्टर्सचे सर्टिफिकिट घेण्यासाठी फेऱ्या मारत आहेत.त्यांना फॉर्म पोलिस स्टेशनतर्फेच देण्यात यावा.फॉर्मचा काळा बाजार थांबवावा.पोलिस स्टेशन व जवळचे वॉर्ड ऑफिस यात समनव्यय साधून सर्टिफिकीट साठी डॉक्टर ऊपलब्ध करून द्यावेत.त्या ठिकाणी कामगार मंत्रालयाच्या वतिने लेबर ऑफिसर ठेवावा. त्यानेही कामगारांची नोंद करून रेल्वेमंत्र्यांशी संपर्क साधून प्रवासी कामगारांना त्या त्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करावी.ह्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी जास्त लक्ष घातले पाहिजे.रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबईचे आहेत.ते कोठे आहेत.त्यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.

  • येथे प्रवासी कामगारांबरोबर प्रश्न असंघटित कामगार,आशा कामगार,सुरक्षा रक्षक,सफाई कामगार,हॉस्पिटल्स मधिल नर्सिस,आया,वॉर्ड बॉईज ईत्यादिंचा प्रश्न निर्माण झालेला आहे.ते कामगार आवश्यक सेवा असल्यामुळे कामावर येतात. त्यांना या काळात जास्त दैनंदिन भत्ता दिला पाहिजे.मुंबई महापालिका तो भत्ता देत आहे.आशा कर्मचाऱ्यांवर तर हल्ले होत आहेत ते थांबवले पाहिजेत.घर कामगार मोलकरणींचाही प्रश्न आहे.
  • कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितिचा गैरफायदा घेऊन डिझास्टर मंनेजमेन्ट ॲक्टचे नाव सांगून अनेक ठिकाणी कामगारांच्या पगाराची घोठवणूक केली जात आहे ईतकच नव्हे तर पगार कमि केला जात आहे.१२,१२ तासांची ड्यूयटी दिली जात आहे.कामगार कायद्यांची पायमल्ली केली जात आहे ते बंद झाले पाहिजे.
  • दुसरा मोठा प्रश्न रेशनचा आहे.धान्य वेळेवर येत नाही.त्यात भेसळ असते त्यासाठी व्हिजिलन्स पथक ठेवली पाहिजेत.महत्वाचे म्हणजे ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीत त्यांनाही रेशन मिळाले पाहिजे.महाराष्ट्रातच अनेक वर्षे राहणाऱ्या नागरिकांना पुरावे नाहीत म्हणून रेशनकार्डे नाकारली गेली आहेत.ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे त्यांना रेशन मिळालेच पाहिजे.रेशनिंग व्यवस्था सार्वर्त्रिक झाली पाहिजे
  • कोरोनाशी लढायच असेल तर डॉक्टर्स नर्सिस,वैद्यकिय कर्मचारी ह्यांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे.महाराष्ट्र सरकारने खाजगी डॉक्टर्सना दवाखाने ऊघडा म्हणून आदेश दिला आहे. तो योग्यच आहे.पण त्यांना योग्य पीपीई,एन९५ मास्क,डबल,ट्रीपल लेयर मास्क ईत्यादि ऊपलब्ध करून दिले पाहिजेत.
  • महाराष्ट्र सरकारने वरळी येथिल नॅशनल स्पोस्टस् सेन्टर,रेस कोर्स पार्किंग प्लेस,सोमय्या ऊद्यानातिल जागा,गोरेगाव येथिल एनएससी च्या काहि जागेवर तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्पिटल्स ऊभारण्याचा निर्णय घेतला आहे ते स्वागतार्ह आहे.ती हॉस्पिटल्स नंतरही सार्वजनिक रूग्णालये म्हणून कायम केली पाहिजेत.सरकारने आरोग्यावर जास्त खर्च केला पाहिजे.
  • आता प्रश्न मुंबई मेट्रोपोलिटिएन रिजनचा मांडतो.यात मुबई,ठाणे,कल्याण डोंबिवली,नवी मुंबई पनवेल पर्यंतचा भाग येतो.मुंबईतिल नागरिक ऐरिलीपर्यंत कामाला जातात तसेच ठाणा,डोंबिवलीतिल माणसे ‘ मुंबई’ ला कामाला येतात.त्या रिजनच्या प्रशासनामध्ये सूसूत्रता नाही.कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ट्रान्सपोर्टची व्यवस्था पाहिजे.आता ती अपूरी आहे बसेसचे ड्रॉपही कमी आहेत व कर्मचाऱ्यांच्या राहणाच्या ठिकाणापासून दूर आहेत.
  • काही प्रश्न केन्द्र शासनाच्या अखत्यारित येतात.मजूर,शेतमजूर,बांधकाम कामगार,ग्रामीण व शहरी कष्टकऱ्यांना प्रत्येकी ७ हजार रूपये द्यावेत,शेतकऱ्यांना एकरी ७ हजार रूपयांचे अर्थसहाय्य करावे,हमिभाव देणारी सरकारी केन्द्रे चालू करावी अशी आग्रही मागणी केन्द्र सरकारकडे प्रा.जोगेंद्र कवाडे सर व जयदीप कवाडे केली आहे.

ईतरांनी शेतिचे,बी बियाण्याचे प्रश्न सविस्तर मांडले आहेत ते मी रिपीट करत नाही.

  • महाराष्ट्रात रिक्षा,टेम्पो,टॅक्सीचालक यांचे प्रश्न तीव्र आहेत त्यांना अर्थसहाय्य झाले पाहिजे.
  • त्याचप्रमाणे केन्द्र सरकारने महाराष्ट्राचा जीएसटीचा हिस्सा ताबडतोब द्यावा यासाठी सर्व राजकिय पक्षांनी एकजूटीने केन्द्राकडे मागणी करावी,महाराष्ट्राने एकजूट दाखवावी.या कोरोनाविरोधाच्या युद्धात पीपल्स रिपब्लिकन पार्टी आपल्याबरोबर रहील.

याशिवाय पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी खालील मुद्दे मांडले..

  • मुंबईत मनपाचेच नव्हे तर महाराष्ट्रात सफाई कामगार कोरोना विरोधातिल युद्धात फ्रन्ट लाईनवर आहेत.त्यांना मास्क,ग्लोव्हज,सॅनिटायझेशनचा सतत पुरवठा झाला पाहिजे.त्यांना मास्क घरी घेऊन जा,धुआ व परत वापरा हे सांगितले जाते.ते कामगार चाळीत किंवा झोपडपट्टीत राहतात.मास्क घरी घेऊन गेले तर कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे.
  • सफाई कामगारांची पिरीऑडीकल टेस्टींग झाली पाहिजे.त्यांना३०० रु विषेश भत्ता दिला पाहिजे व कामावर येण्यासाठी बसेस ऊपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
  • एमजीएम हॉस्पिटल सारख्या हॉस्प्पिटलचा ऊपयोग नॉन कोविड रुग्णासाठी करावा
  • प्रत्येक विभागात एक आयएसए नोडल अधिकारी म्हणून नेमावा त्याने फिल्डवरही गेले पाहिजे.म्हणजे कोरोना विरोधी युद्धाअला सूसूत्रता येईल.

वरील सुचना पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे मुख्यमंत्री यांना करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button