कळवण तालुक्यात वीज ग्राहकांच्या गावनिहाय तक्रारीची महावितरण दखल घेणार / गावनिहाय तक्रारी सोमवारपासून जाणून घेण्याची जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा सौ जयश्रीताई पवार यांची सूचना
विजय कानडे
कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवाना व वीज ग्राहकांना वाढीव वीज बिल न देता नियमित बिल द्यावे ते बिल ग्राहक भरणार मात्र
महावितरणचा मनमानी कारभारामुळे वाढीव वीज बिल, कोरडी विहीर तरी लाखोंचे वीज बिल, मीटर नाही तरी अंदाजे वीज बिल, जीर्ण झालेल्या तारा, अखंडीत वीज पुरवठा, वीजेची मागणी आणि ओव्हरलोड परिस्थिती यासह अनेक तक्रारींचा पाढा चणकापूर परिसरातील शेतकरी व वीज ग्राहकांनी जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा सौ जयश्रीताई पवार यांच्या समोर मांडला, महावितरणचे तालुक्यातील सर्व विभागाचे वीज अभियंता यांनी तक्रारी जाणून घेत सोमवारपासून गावनिहाय वीज ग्राहकांच्या तक्रारी जाणून घेत वीज बिल व सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात तातडीने महावितरण पावले उचलणार अशी ग्वाही चणकापूर येथील बैठकीत महावितरणच्या यंत्रणेने दिली. सौ जयश्रीताई पवार यांनी तक्रारी जाणून घेत आमदार नितीनभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाढीव वीज बिल संदर्भातील तक्रारी व सुरळीत वीज पुरवठा संदर्भात पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही बैठकीत दिली. बैठकीला चणकापूर परिसरातील शेतकरी, सरपंच, सोसायटीचे चेअरमन, पोलीस पाटील, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






