कोरोना संकटामुळे अडचणीत आलेल्या मजूर, शेतकरी रिक्षा चालक व हातावर पोट असणाऱ्यांना मजुरांना सरकारने 5000 आर्थिक मदत करावी…उपसरपंच विजयसिंह माने ईश्वर वठार .तालुका पंढरपूर
प्रतिनिधी रफिक आतार
महाराष्ट्र मध्ये सध्या कोरोनाच्या महामारी संकटामुळे गोरगरीब गरजू ,मजूर, रिक्षा चालक, कामगार व हातावर पोट असणाऱ्या लोकांचे आर्थिक उलाढाल नसल्यामुळे दोन वेळचे जेवण व संसार संभाळण्याचे त्यांच्यापुढे संकट आले आहे एखादा दुसरा दिवस कामाला नाही गेले तर त्यांना इतरांकडून उसने घ्यावे लागतात परंतु दोन महिन्याच्या लॉकडाउन मुळे आर्थिक देवाणघेवाण नसल्यामुळे पैशाची कमतरता जाणवू लागली आहे त्यामुळे सरकारने आर्थिक निकष लावून जे गोरगरीब आहेत अशा लोकांना कोणतीही जास्त अटी न ठेवता तात्काळ रुपये पाच हजाराची मदत करावी व त्यांची होणाऱ्या उपासमारी पासून सुटका करावी काही दानशूर व्यक्ती स्वयंसेवक संस्था यांच्यावतीने मोलाचे सहकार्य या काळात झाले त्यामुळे त्यांचा सरकारने सन्मान करावा






