ठाणे येथे आदिवासी विकासा बदल राज्य स्तरीय बैठक
प्रतिनिधी – दिलीप आंबवणे
ठाणे येथे आदिवासी विकास मंत्री अँड. के. सी. पाडवी यांच्या सोबत आदिवासी आमदार खासदार तसेच संघटनेच्या प्रतिनिधी ची बैठक पार पडली.
याप्रसंगी माजी मंत्री अँड. पद्माकर वळवी, माजी आमदार डॉ संतोष टारफे, माजी आमदार वैभव पिचड, बिरसा क्रांती दल संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी, डॉ. रामकृष्ण पेंढेकर, डॉ संजय दाभाडे, कुसूम आलाम, अतुल कोवे आदी नागरीक उपस्थित होते.
त्यावेळी बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे डी. बी. टी. रद्द करणे. सेंट्रल किचन रद्द करणे. बोगस आदिवासीवर सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कार्यवाही करणे. धोकाग्रस्त वन विभागातील आदिवासींचे दावे निकाली काढणे. आश्रम शाळा सुधारण्यासाठी कालबद्द कार्यक्रम आखणे. आदिवासी महामंडळ अधिक सक्षम करणे. आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी खेचून आणने व योग्य बजेट तयार करणे. इत्यादी गोष्टींवर सखोल चर्चा करुन निर्णय घेण्यात आले.






