Maharashtra

रूग्णालयांकडून प्रथमोपचार न मिळाल्यास रूग्णालयासमोर उपोषणास बसणारी नगरसेवक विक्रम भैया शिरसट यांचा इशारा

रूग्णालयांकडून प्रथमोपचार न मिळाल्यास रूग्णालयासमोर उपोषणास बसणारी नगरसेवक विक्रम भैया शिरसट यांचा इशारा

प्रतिनिधी रफीक आत्तार

सध्या पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना रूग्णांच्या संख्यात वाढ होत चालली आहे. याच काळात इतर आजाराने ग्रस्त असलेला एकादा रूग्ण उपचार घेण्यासाठी आला असता त्याला तातडीने उपचार मिळणे गरजेचे असतानाही रूग्णालयांकडून प्रथमोपचार मिळण्यास रूग्णांना विलंब लागत आहे. यामुळे रूग्णांचा मृत्यू देखील होण्याची शक्यता आहे. याचा विचार करून रूग्णालयांनी प्रथमत: रूग्णांवर प्रथमोपचार करावे व रूग्णांना जीवनदान द्यावे अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी यांना नगरसेवक विक्रम शिरसट यांनी दिले आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना या महामारी रोगाचा विळख आवळला जात असून रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पंढरपूर तालुक्यात 350 हून अधिक कोरोना पॉजिटिव्ही व 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पंढरपूर शहर व तालुक्यात इतर आजाराने ग्रस्त असलेला एकादा रूग्ण उपचार घेण्यासाठी आला असता त्याला तातडीने उपचार मिळणे गरजेचे असतानाही रूग्णालयांकडून प्रथमोपचार मिळण्यास रूग्णांना विलंब लागत आहे. तसेच रूग्णास सोलापूर येथील रूग्णालयात उपचारासाठी घेवून जात असताना प्रथमोपचार मिळाला नसल्यामुळेमध्येच त्याचा मृत्यू होत आहे. त्यामुळे सर्व रूग्णालयांनी प्रथमोपचार करावे अशा मागणीचे निवेदन नगरसेवक विक्रम शिरसट यांनी प्रांताधिकारी यांना दिले आहे. या मागणीची तात्काळ दखल घेण्यात यावी अन्यथा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खाजगी व सरकारी रूग्णालयांमध्ये प्रथम उपचार न मिळाल्यास त्या रूग्णालयांसमोर उपोषण करणार असल्याचा इशारा नगरसेवक विक्रम शिरसयट यांनी दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button