प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ब्राम्हणशेवगे येथे आरोग्य सेवकास तालुका आरोग्य अधिकारीच हजर करून घेत नाही.
आरोग्य सेवक विश्वजित कांबळे यांचा खळबळजनक खुलासा
ब्राम्हणशेवगे ता.चाळीसगाव
येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ब्राम्हणशेवगे हे तालुका आरोग्य अधिकारी यांचे आशीर्वादाने बंद अशा आशयाच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर अनेक गंभीर प्रकार समोर आले आहेत.
डॉ. देवराम लाडे हे आपल्या अधिपत्याखालील कर्मचारीना वेठीस धरुन त्रास देत असल्याचे आरोग्य सेवक विश्वजित कांबळे यांनी म्हटले आहे,
विश्वजित कांबळे यांनी आपली आपबिती मांडताना म्हटले आहे की,मी गेली चार महिन्यापासून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लाडे व शिरसगाव वैद्यकीय अधिकारी यांना ब्राम्हणशेवगे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे हजर करून घेण्यासाठी विनंती करत आहे. परंतु त्यांचे मित्र आरोग्य सहाय्यक तेळगाव एल.सी.जाधव यांचे सांगण्यावरुन डॉक्टर लाडे व डॉ. सांगळे मला हजर होऊ देत नाही. त्यांना अनेक मोठ्या मोठ्या अधिकारी जसे की,जिल्हा हिवताप अधिकारी यांनी सागुन सुध्दा दुर्लक्ष करत आहेत तसेच अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अपमान करत आहेत जाणून बुजून खोटारडे आरोप करून बदनामी करत आहेत तसेच तळेगाव चे आरोग्य सहायक एल .सी. जाधव तर जीवे मरण्याची धमकी देत आहेत अजून पण खूप काही कुरापती आहेत यांच्या मागच्याच दोन दिवसापूर्वी मी शिरसगाव येथे हजर होण्यास आलो असता खूप खालच्या पातळीत जाऊन मला हजर केले नाही.आणि ४ महिन्यापासून माझे वयक्तिक नुकसान करून पगार पण अडकवून ठेवला आहे मी खूप प्रयत्न केला कामावरती येण्याचा पण डॉक्टर लांडे यांनी मला हजर होऊ दिले नाही आणि उलट असा दम भरला आहे की ते आहेत तोपर्यत मला ते कधीच कामावर येऊ देणार नाही आणि आलोच तर असा काही त्रास देयीण की कधीच विसरणार नाही .त्यामुळे क्रुपया करून कोरोना सारख्या महाभयंकर रोगाच्या साथीत आपले गाव सुरक्षित ठेवण्यासाठी मला आरोग्य सेवक या पूर्व पदावर हजर करून घेण्यासाठी आपण आपल्याकडून थोडी मदत मणून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर लांडे यांच्याशी बोलणे करावे.
आरोग्य सेवक ब्राम्हणशेवगे .
विश्वजीत पोपट कांबळे* .
अशाप्रकारे आरोग्य सेवक विश्वजित कांबळे यांनी आपली कैफियत मांडली आहे.
विश्वजित कांबळे याच्या सारखाच अनेक कर्मचारी वर्गाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ लाडे व त्यांचे मर्जितील अधिकारी त्रास देत असल्याचे उघड झाले आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव येथे बिनधास्त पणे नको ते उद्योग तालुकाआरोग्य अधिकारी डॉ लाडे व त्यांचे मर्जितील अधिकारी यांच्या आशीर्वादाने चालतात.या गंभीर प्रकारांची वरिष्ठ स्तरावरुन चौकशी होऊन तालुका आरोग्य अधिकारी डॉ लाडे व त्यांचे मर्जितील अधिकारी यांची चौकशी होऊन कारवाई व्हावी तालुका आरोग्य अधिकारी डॉ लाडे यांची बदली करावी अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाचे प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी यांनी केली आहे.






