Nashik

मविप्र संस्थेच्या दिंडोरी कॉलेज येथे पत्रकारांचा सन्मान प्रसंगी परिवर्तनासाठी वृत्तपत्रांचे योगदान महत्त्वाचे- प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे

मविप्र संस्थेच्या दिंडोरी कॉलेज येथे पत्रकारांचा सन्मान प्रसंगी परिवर्तनासाठी वृत्तपत्रांचे योगदान महत्त्वाचे- प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे

सुनील घुमरे नाशिक

नाशिक : समाज परिवर्तनासाठी वृत्तपत्रांचे योगदान सर्वज्ञात आहे. समाजात घडणाऱ्या घडामोडी ,घटना सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम वृत्तपत्रांच्या माध्यमातून पत्रकार बंधु करीत आहे ऊन, वारा ,पाऊस हे सर्व झेलत पत्रकारितेचा वसा हाती घेऊन अविरतपणे यांचे कार्य चालू आहे .असे प्रतिपादन प्राचार्या डॉ.वेदश्री थिगळे यांनी केले त्या मविप्र दिंडोरी महाविद्यालयात आयोजित पत्रकार दिन कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या..
प्रसंगी पत्रकार बंधूंचे प्रेरणा असलेले बाळशास्त्री जांभेकर यांना फक्त ३४ वर्षांचे आयुष्य लाभले परंतु आपल्या अल्प आयुष्यात त्यांनी दर्पण सारखे वृत्‍तपत्र सुरू करून पारतंत्र्याच्या काळात लोकांमध्ये स्वातंत्र्य प्रेम ,मराठी भाषा विषयक प्रेम रुजवत समाज जागृती केली त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करीत सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ६जानेवारी १८३२ या दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो पत्रकार दिनाचे औचित्य साधून मविप्रच्या दिंडोरी महाविद्यालयात दिंडोरी परिसरातील सर्व पत्रकार बंधूंचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संतोष कथार, नितीन गांगुर्डे, संदीप मोगल सुखदेव खुर्दळ,बाळासाहेब अस्वले, अशोक निकम, सुनील घुमरे,किशोर देशमुख ,आदी पत्रकार बंधू उपस्थित होते .तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे या होत्या डॉ.शिंदे ,पी. के पानपाटील, आर. के. जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर संतोष कथार यांनी सर्व पत्रकारांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की, १८३२ते२०२१हा जवळपास पावणे दोनशे वर्षाचा काळ… मराठी पत्रकारितेने या काळात अनेक स्थित्यंतरे अनुभवली दरम्यान पत्रकारिता बदलत राहिली आहे ,या बदलांशी स्वतःला जुळवून घेताना माध्यमांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला ,आजही करावा लागत आहे ..तसेच वृत्तपत्र लेखनाची काही कौशल्य व तंत्र त्यांनी उपस्थितांना सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बलराम कांबळे यांनी केले कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमात कोविड -19 च्या सर्व नियमाचे पालन करीत कार्यक्रम साजरा करण्यात आला
फोटो- मविप्र दिंडोरी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात पत्रकार दिन कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे व दिंडोरी तालुक्यातील पत्रकार

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button