तापी पुलावरून उडी घेऊन संपवली जीवनयात्रा
रावेर येथील इसमाची आत्महत्या
खिर्डी प्रतिनिधी:- प्रविण शेलोडे
खिर्डी येथून जवळच असलेल्या तापी नदी पात्रात रावेर येथील गांधी चौक भोई वाडा येथील ७१ वर्षीय इसमाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की रावेर येथील गांधी चौक भोई वाडा येथील रहिवाशी विलास दामोदर भावे वय ७१ याने पिंपरी पुलावरून उडी घेवून आत्महत्या केल्याचे दुपारी नदीपात्रात छनं विछांन परिस्थितीत मिळून आले मयताचे भाऊ प्रकाश दामोदर भावे यांनी ओळख पटल्यानंतर निभोरा पोलिस स्टेशन येथे खबर दिली त्यांच्या खबरी वरून निभोरा पोलिस स्टेशन चे ए.पी.आय स्वप्नील उंनवणे साहेब ,कॉन्स्टेबल अब्बास तडवी ,कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटील ,यांनी पंचनामा करून ऐंनपुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संदीप चौरे यांनी जागेवर शव विच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देवून ऐंनपुर येथील स्मशान भूमीत अग्निडाग देण्यात आला आत्महत्येचे कारन अद्याप समजू शकले नसलेमूळे याबाबत अकस्मात मृत्यूची ३०/२०२१ नुसार नोंद करण्यात आली आहे पुढील तपास निभोरा पोलिस स्टेशन चे ए पी आय स्वप्नील उन्नवने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चौधरी करीत आहे






