Jalana

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभार्थ्यांचा मोबाईल व आधार क्रमांकाचे सिडींग करावे – जिल्हा पुरवठा अधिकारी

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभार्थ्यांचा मोबाईल व आधार क्रमांकाचे सिडींग करावे – जिल्हा पुरवठा अधिकारी

संजय कोल्हे जालना

जालना : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार सिडींग १००% पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेच्या सुमारे १६.९३ लक्ष लाभार्थ्यांपैकी ८९% लाभार्थ्यांचे आधार सिडींग झाले आहेत. शासन निर्देशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबवून लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल सिडींग करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वस्त धान्य दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील eKYC द्वारे आधार सिडींग व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करून आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढविण्यात येत आहे. दि.३१ जानेवारी २०२१ पूर्वी प्रत्येक रेशनकार्डमध्ये लाभार्थ्यांचे १००% आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्याच्या उद्दिष्टाने जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येत आहे.
माहे जानेवारी २०२१ चे धान्याचे वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाद्वारे स्वस्त धान्य दुकानदार यांच्यामार्फत कुटुंबातील सदस्याचा आधार सिड नसल्यास अशा सदस्याचा आधार व मोबाईल क्रमांकाचे लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या स्वस्त धान्य दुकानाच्या ठिकाणी जावून सिडींग पूर्ण करून घ्यावे.
eKYC पडताळणी व मोबाईल सिडींग सुविधा वापरण्याची कार्यप्रणाली स्वस्त धान्य दुकानदार यांना कळविण्यात आलेले आहे. आवश्यक तेथे ही सुविधा वापरण्याबाबतचे प्रशिक्षण दुकानदारांना देण्यात येत आहे. दि.३१ जानेवारी २०२१ पर्यंत आधार सिडींग न-झालेल्या लाभार्थ्यांचे अनुज्ञेय धान्य पुढील महिन्यापासून आधार सिडींग होई पर्यंत निलंबित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सदर बाब होऊन लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहू नये यासाठी ३१ जानेवारी २०२१ पूर्वी आधार आणि मोबाईल क्रमांक सिडींग १००% पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती बसैय्ये यांनी केले आहे.
“ज्या शिधापत्रिकांवर मागील सलग ३ महिन्यात धान्य उचलण्यात आले नाही, अशा सर्व शिधापत्रिका तात्पुरती निलंबित करण्यात येईल किंवा धान्य अनुदान नसलेल्या योजनेत वर्ग करण्यात येणार आहे. अन्नधान्य लाभासाठी अशा शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंब प्रमुख यांचे लेखी निवेदन तहसीलदार यांना प्राप्त झाल्यानंतरच कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार सिडींग करून सदर शिधापत्रिका पात्र योजनेखाली समाविष्ट करण्यात येईल. धान्य उचलण्यात न-आलेल्या सर्व शिधापत्रिका जानेवारी २०२१ नंतर कायमस्वरूपी निलंबित करण्यात येईल. त्यामुळे आधार व मोबाईल क्रमांक सिडींग पूर्ण करण्याची कार्यवाही लाभार्थ्यांनी तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती आर.एम.बसैय्ये यांनी केले आहे.”

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button