Nashik

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची खा.डॉ.भारती पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची खा.डॉ.भारती पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

सुनील घुमरे

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील दिंडोरी, कळवण, पेठ, सुरगाणा, देवळा, चांदवड, येवला, निफाड ह्या तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वारा ,पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे .शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे तर येवला तालुक्यात वीज पडून जीवित हानी झाली आहे .एकीकडे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने थैमान घातलेले असतांना शेतकरीवर्ग पुरता हवालदिल झाला आहे.

त्याच्यावर निसर्गाची ही अवकृपा झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून संपूर्ण पीक नष्ट झाले आहे. अश्या परिस्थितीत बळीराजाला मदत मिळाली पाहिजे. नुकसान झालेल्या शेतीमालाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळणेकामी उचित कार्यवाही होऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला योग्य न्याय मिळून द्यावा अशी विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे खा.डॉ.भारती प्रवीण पवार यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button